JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रडतच रियाने सांगितली तिची कहाणी, का म्हणाली- भट्ट सर त्याने मला घराबाहेर काढलं

रडतच रियाने सांगितली तिची कहाणी, का म्हणाली- भट्ट सर त्याने मला घराबाहेर काढलं

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि बॉलिवूडचे दिग्गज निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या फोटोंबद्दल चर्चा होत होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि बॉलिवूडचे दिग्गज निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या फोटोंबद्दल चर्चा होत होती. तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि महेश भट्ट यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. रियाने असे सांगितले की तिने जेव्हापासून महेश भट्ट यांच्याबरोबर काम करत आहे तेव्हापासून त्यांचे नाते खूप चांगले आहे. ते तिच्यासाठी वडीलांसारखे असल्याचे रियाने म्हटले आहे. रिया असे म्हणाली की, ‘म्हणूनच जेव्हा मी 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले तेव्हा त्यांच्याशी बातचीत केली होती.’ रिया चक्रवर्तीने असे म्हटले आहे की, ‘जेव्हा 8 जून रोजी मी सुशांतचे घर सोडले तेव्हा माझे महेश भट्ट यांच्याशी बोलणे झाले. ते मला चाइल्ड म्हणतात आणि मी त्यांना सर म्हणून बोलावते. मी त्यांना त्यादिवशी सांगितले की मला घराबाहेर काढण्यात आले आहे. मी आतमधून पार कोलमडले आहे. सर त्याला कळत नाही आहे, मी इतके दिवस त्याची (सुशांतची) देखरेख केली. त्याची देखभाल करता करता माझी अवस्था खराब झाली तर मला घराबाहेर काढत आहे. तरी त्याने मला जाण्यास सांगितले.’ (हे वाचा- SSR Case Update : सीबीआयच्या मागणीनंतर मुंबई पोलीस देणार रियाला सुरक्षा )

(हे वाचा- ‘मी सिद्धार्थ पिठानी…’, सुशांतच्या मित्राचा जबाब न्यूज18 लोकमतच्या हाती) यावेळी सुशांतबाबत बोलताना रिया भावुक झाली होती. तिने रडत रडत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. सुशांतने तिला घरातून बाहेर काढण्याबाबतही तिने रडत रडत सांगितले होते. मात्र रियाची एक चॅट व्हायरल झाल्याचा दावा काही मीडिया अहवालात केला गेला होता. त्यामध्ये मात्र रियाने असे म्हटले आहे की आता ती उजेडात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या