JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आलिया-रणबीरच्या 'Love Story'मध्ये नवा ट्विस्ट, लग्नाबाबत आई म्हणाली...

आलिया-रणबीरच्या 'Love Story'मध्ये नवा ट्विस्ट, लग्नाबाबत आई म्हणाली...

आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

जाहिरात

बॉलिवूडमधील क्यूट जोडी रणबीर कपूर लवकरच लग्न करतील अशा चर्चा आहेत. या दोघांनीही मागील वर्षी आपल्या नात्याची कबूली दिली होती. त्यानंतर दोघंही अनेकदा एकमेकांच्या फॅमिली सोबत वेळ घालवताना दिसले. या दोघांच्या वयामध्ये 10 वर्षांचं अंतर आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मे : सोशल मीडियापासून ते वृत्तवाहिनींपर्यंत बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भट आणि चॉकलेट बॉय रणबीर कपूरच्या प्रेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांनीही एकमेकांबाबत असलेलं प्रेम जाहिररित्या व्यक्त केलं आहे. पण या दोघांच्याही ‘लव्ह स्टोरी’मध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे. आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कारण सोनी राजदान यांनी आपली मुलगी आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नासंदर्भात उपस्थित करण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांना पूर्णविराम देत पसरत असलेल्या बातम्या निराधार असल्याचं म्हटलं आहे. वाचा : Hook Up Song : आलिया- टायगरचा पोल डान्स व्हिडिओ व्हायरल गेल्या बऱ्याच दिवसांपासून आलिया-रणबीरच्या लव्हस्टोरीची तुफान चर्चा सुरू आहे. यादरम्यान ऋषी कपूर यांना कर्करोगाचे निदान झाल्याचेही वृत्त समोर आलं होतं. ऋषी यांची प्रकृती पाहता आलिया-रणबीरच्या विवाहच्या अफवा जोर धरू लागल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया-रणबीरदेखील दीपिका-रणवीरप्रमाणेच इटलीत लग्न थाटणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण या वृत्तास सोनी यांनी  स्पष्ट नकार दिला आहे. IANS सोबत संवाद साधत असताना आलियाची आई सोनी राजदान यांनी या सर्व बातम्या निराधार असल्याचं सांगितलं आहे. पाहा : VIDEO- रणबीर कपूरनं फोटोग्राफरला विचारलं, चप्पल कुठून घेतली ? आणि… …और प्यार हो गया ! आलियानं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, ‘11 वर्षांची असताना ती पहिल्यांदा रणबीरला भेटली होती. ‘ब्लॅक’ सिनेमासाठी ऑडिशन देण्यास गेलेल्या आलियानं रणबीरला पाहिलं आणि ती क्लिन बोल्डच झाली होती’. यानंतर आगामी ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या शूटिंगनिमित्त दोघंही एकमेकांच्या जवळ आले. यादरम्यानच दोघांच्या अफेअरच्या आणि लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. आलियापूर्वी रणबीरचं नाव दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफसोबत जोडले गेले आहे. वाचा : आलियाशी तुलना केल्यानं भडकली कंगना रणौत, दिली ‘ही’ प्रतिक्रिया अभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या