JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका

'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका

बॉलिवूडची (Bollywood) पंगा क्वीन कंगना रनौत (Kangna Ranaut) आत्ता पुन्हा एका राजकीय पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटात झळकणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून- बॉलिवूडची (Bollywood) पंगा क्वीन कंगना रनौत (Kangna Ranaut) आत्ता पुन्हा एका राजकीय पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटात झळकणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित ‘थलाइवी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच कंगनाने पुन्हा एका राजकीयपटाची तयारी सुरु केली आहे. ‘मानिकार्निका: द क्वीन ऑफ झांसी’ साठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेली कंगना आत्ता देशाच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना या चित्रपटासाठी खुपचं उत्सुक असल्याचं सांगितलं जातंय.

संबंधित बातम्या

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ शेयर केले आहेत. यामध्ये ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत परफेक्ट बसण्यासाठी आपल्या शरीराचे माप देताना दिसत आहे. कंगनाने स्वतः स्टोरीमध्ये लिहिलं आहे, की हा चित्रपट 1975 च्या आणीबाणीवर आधारित आहे. यासाठी कंगना आपल्या मनिकर्निका प्रोडक्शन हाउसच्या ऑफिसमध्ये आपलं माप देताना दिसत आहे. कंगनाने वर्षाच्या सुरुवातीलाचं या चित्रपटाची घोषणा केली होती. तसेच कंगनाने म्हटलं होतं, की हा चित्रपट बयोपिक नसणार आहे. तर हा चित्रपट महत्वाच्या राजकीय घटनेवर आधारित असणार आहे. या चित्रपटामुळे आजच्या पिढीला देशाच्या घडून गेलेल्या आणि पुढच्या राजकीय घटना समजण्यास मदत होणार असल्याचंही तिनं म्हटलं आहे. (हे वाचा: ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL   ) प्रेक्षक कंगनाच्या आगमी ‘थलाईवी’ चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनचं चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. कंगनाच्या या चित्रपटाला एक दिवसापूर्वीचं सेन्सॉर बोर्डकडून ‘यू’ सर्टिफिकेट मिळालं आहे. कंगनाचा हा चित्रपट 23 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या