लंडन, 19 जून : अभिनेता इरफान खान सध्या न्यूरोएंडोक्राइन कॅन्सर या दुर्धर आजारावर लंडनमध्ये उपचार घेतोय. आपलं काम,करियर, आरामदायी आयुष्य सगळ्या गोष्टींना पूर्णविराम मिळालाय. या उपचारा दरम्यान टाइम्स नेटवर्कचे अंशुल चतुर्वेदी यांच्याशी इरफाननं संवाद साधलाय.तो म्हणालाय, अनिश्चितता हीच एक निश्चित गोष्ट आहे हे मला neuroendocrine cancerशी लढताना समजली. हेही वाचा चीनमध्ये ‘या’ जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का? रेल्वे रुळ, रस्ते गेले वाळूच्या ढिगाऱ्याखाली, आता उंटांवरून दळवळण इरफान खान सांगतो,मी अनेक स्वप्नं आणि इच्छा आणि महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून एका भरधाव ट्रेनने जात होतो आणि अचानक टीसी येऊन म्हणाला तुमचा स्टाॅप आलाय. आता तुम्हाला उतरावं लागेल. हेही वाचा वास्तुशांतीच्या महाप्रसादातून विषबाधा, 3 मुलांचा मृत्यू, 25 जणांची प्रकृती गंभीर नाशिकच्या एटीएममधून निघाले पाच पट पैसे, 5 तासात काढले 2 लाख 68 हजार त्यानं लंडनहून आपल्या फॅन्सना पत्र लिहिलंय. इरफानचं पत्र न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हे नावच माझ्यासाठी नवीन होतं. या दुर्धर आजाराविषयी माहितीच कमी उपलब्ध असल्याने उपचाराबाबतही प्रश्नचिन्ह होते. उपचाराची चाचणी जणू काही माझ्यावरच केली जात होती. त्याची काहीच शाश्वती नव्हती. या खेळाचा मी एक भाग होतो. मला होणाऱ्या वेदना भयंकर आहेत. त्यावेळी फक्त आणि फक्त तीव्र वेदना जाणवतात. संपूर्ण विश्व त्या क्षणी एक होतं आणि फक्त एकच गोष्ट तीव्रतेने जाणवत असते, ती म्हणजे वेदना. ज्या रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू आहेत त्याच्यासमोर लॉर्ड्स स्टेडियमची मागची बाजू दिसते. मला जाणवणाऱ्या वेदनांमध्ये विवियन रिचर्ड्सचा हसऱ्या चेहऱ्याचा पोस्टर मला दिसला. पण ते जग माझं राहिलंच नाही असं वाटू लागलं. जीवन- मरणाच्या या खेळामध्ये फक्त एकच मार्ग आहे. एका बाजूला रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला स्टेडियम. कुठेच कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही आणि हीच गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. या जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणते अनिश्चितता हेच मला त्यावेळी जाणवलं. माझी ताकद काय आहे, शक्ती काय आहे हे ओळखून हा खेळ अधिक चांगल्या प्रकारे खेळणं, इतकंच काय ते आता माझ्या हातात राहिलं आहे. अनिश्चिततेची जाणीव झाल्यामुळे मी आता परिणामांची चिंता न करता सर्व काही देवाच्या हाती सोपवून त्याच्यावर विश्वास ठेवून जगू लागलो आहे. मला स्वातंत्र्य म्हणजे काय, मुक्तता म्हणजे काय हे तेव्हा खऱ्या अर्थाने समजलंय. ‘या संपूर्ण प्रवासात, जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक माझ्यासाठी प्रार्थना करू लागले. त्यांच्या प्रार्थनांमुळे मला बळ मिळू लागलं.