JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / A R Rahman यांच्या मुलीने बांधली लग्नगाठ,पाहा कोण आहे प्रसिद्ध संगीतकाराचा जावई

A R Rahman यांच्या मुलीने बांधली लग्नगाठ,पाहा कोण आहे प्रसिद्ध संगीतकाराचा जावई

ए आर रहमान यांच्या मुलीचं नुकतंच लग्न पार पडलं. रहमान यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,6 में- महान संगीतकार ए आर रहमान    (AR Rahman)  आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांना आपल्या खाजगी आयुष्याबाबत सर्वांसमोर फारसं बोलायला आवडत नाही. त्यामुळे ते फारच कमी प्रसंगी आपल्या खाजगी आयुष्याबाबत पोस्ट शेअर करत असतात. आज ते अशाच एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. ए आर रहमान यांच्या मुलीचं नुकतंच लग्न पार पडलं. रहमान यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. या फोटोवर सध्या चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एआर रहमान यांची मुलगी खदिजा रहमानने  (Khatija Rahman) नुकतंच रियासदीन शेख मोहम्मदशी  (Riyasdeen Shaik Mohamed)  लग्न केलं  (Wedding) आहे.त्यांच्या लग्नाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो स्वतः रहमान यांनी शेअर केला आहे. फोटो शेअर करत ए आर रहमान यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘देव या जोडप्याला आशीर्वाद देईल..तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद.’ संगीतकाराने काही तासापूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर जवळजवळ ३ लाखांपर्यंत लाईक्स मिळाले आहेत. या जोडप्याचे जवळचे नातेवाईक आणि चाहते कमेंट करून त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करत आहेत. या फोटोमध्ये खतिजा रहमान एका सुंदर पांढऱ्या रंगाच्या पारंपारिक पोशाखात दिसत आहे. रियासदीन शेख मोहम्मद यानेही खतिजासोबत आपला आऊटफिट मॅच केला आहे. पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तो हॅन्ड्सम दिसत आहे. एआर रहमानचे चाहते पोस्टवर दोघांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

खतिजा रहमानने 29 डिसेंबरला रियासदीन शेख मोहम्मदसोबत साखरपुडा केला होता. त्या दिवशी तिचा वाढदिवसही होता.त्यानंतर खतिजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. खतिजाने लिहिलं होतं की, ‘सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाने, रियासदीन शेख मोहम्मदसोबत माझा साखरपुडा झाला हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. तो एक उद्योजक आणि ऑडिओ इंजिनिअर आहे. माझ्या वाढदिवशी २९ डिसेंबरला जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. फारच कमी लोकांना माहिती असेल की, एआर रहमान यांची मुलगी खतिजाने तामिळ चित्रपटांसाठी काही गाणी गायली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या