JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण ; पोस्ट शेअर करत दिली माहिती

शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण ; पोस्ट शेअर करत दिली माहिती

देशात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. बॉलिवूड सेलेब्स कोरोनाचा कहर दिसून येत आहे.आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला (Shilpa Shirodkar) देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 डिसेंबर-​ देशात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. बॉलिवूड सेलेब्समध्ये देखील  कोरोनाचा कहर दिसून येत आहे.  बी टाऊनमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत आहेत.  करीना कपूर (Kareena Kapoor Khan),अमृता अरोरा आणि आता अर्जुन कपूर(Arjun Kapoor), अंशुला, रिया (Rhea Kapoor) , नोरा फतेहीला (Nora Fatehi) देखील कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला (Shilpa Shirodkar) देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पाने सोशल मीडिया पोस्ट करत याची माहिती दिली आहे. शिल्पा शिरोडकरने इन्स्टा पोस्ट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. चार दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिनं या इन्स्टा पोस्टमधून दिली आहे. यानंतर तिनं स्वत:ला क्वारंटीन करून घेतले आहे. ती योग्य ती काळजी घेतल्याचे देखील तिनं म्हटलं आहे. shilpa shirodkar, shilpa shirodkar instagram शिल्पा शिरोडकर ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे, जिला कोविडची लस मिळाली आहे. तिला वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाची लस मिळाली होती. आता ती स्वतः कोरोनाच्या विळख्यात आली आहे. त्यानंतर तिनं पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना कोरोनाचे नियम पाळण्यास देखील सांगितले आहे. वाचा- बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर! अर्जुन कपूरनंतर नोरा फतेहीला कोरोनाची लागण शिल्पाने पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, तुम्ही सर्व सुरक्षित रहा. लस घ्या आणि सर्व नियमांचे पालन करा. तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुमच्या सरकारला माहीत आहे. खूप प्रेम.’ शिल्पाने आंखे, हम आणि खुदा गवाह यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये अभिनयाची छाप सोडली आहे. वाचा- ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहा आणि परीचे हिलेरियस फ्यूजन पाहिले का? शिल्पा शिरोडकरला कोरोना होण्यापूर्वी  अर्जुन कपूर, अंशुला, रिया कपूर तसेच अभिनेत्री नोरा फतेहीला   (Nora Fatehi)  कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी करीना कपूर तसेच तिची मैत्रीण अमृता अरोरा, सीमा खान यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या