JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचं टीव्हीवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचं टीव्हीवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या सार्वजनिक ठिकाणी किंवा एकाद्या कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसून येतात. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेखा या लवकरच टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत.

जाहिरात

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचं टीव्हीवर कमबॅक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जून- ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या सार्वजनिक ठिकाणी किंवा एकाद्या कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसून येतात. आता त्या फारशा सिनेमातही दिसत नाहीत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेखा या लवकरच टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. स्टार प्लसवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या हिट मालिकेत त्या दिसणार आहेत. स्टार प्लसवरील ‘गुम है किसी के प्यार में’ ही मालिका केवळ जुन्या पिढीसाठीच नव्हे, तर तरुण पिढीसाठीही क्लासिक आणि सुपरिचित मालिका ठरली आहे. जबरदस्त ट्विस्टमुळे हा शो नेहमीच टीआरपी लिस्टमध्ये नंबर वन राहिला आहे. आता या शोमध्ये अभिनेत्री रेखा यांची एंट्री होणार आहे. वाचा- आज 10 कोटी मानधन घेणाऱ्या समांथाचा पहिला पगार ऐकून धक्का बसेल रेखा स्टार प्लसवर तिसर्‍यांदा दिसणार आहेत. याआधीही त्या ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत दिसल्या होत्या.जेव्हा प्रेक्षकांनी याआधी रेखा यांना टीव्हीच्या पडद्यावर पाहिलं तेव्हा त्यांना आनंद झाला होता. रेखा यांचा या मालिकेशी खास संबंध राहिला आहे. या मालिकेत विराजची भूमिका साकारणाऱ्या निल भट्टच्या लग्नातही रेखा यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीनं सर्वजण भारावून गेले होते.

येत्या काळात ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत मोठे ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. रेखा शोच्या नव्या कलाकारांची ओळख करून देणार आहेत.त्यामुळे त्या या शोमध्ये स्पेशल भूमिकेत दिसणार आहेत.

पिंकविलाच्या रिपोर्ट्सनुसार, रेखा या सुरुवातीपासूनच ‘गुम है किसीके प्यार में’मालिकेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी शोच्या सुरुवातीस शोचे मुख्य व्यक्तिरेखा , नील भट्ट, आयशा सिंग आणि ऐश्वर्या शर्मा यांची ओळख करून दिली होती. आणि आता, शो जसजसा लीप घेत आहे, तशी नवीन कलाकारांची ओळख करून देतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या