JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'भारतात कोणालाही कोणाचीही पूजा ....' ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याप्रकरणी रवीना टंडनचं ट्वीट चर्चेत

'भारतात कोणालाही कोणाचीही पूजा ....' ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याप्रकरणी रवीना टंडनचं ट्वीट चर्चेत

एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवैसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं होतं. अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon ) हिनं देखील एक ट्वीट केलं आहे. सध्या तिचं हे ट्वीट सोशल मीडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मे- बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर विविध मुद्दयांवर मत मांडताना दिसते. आता रवीना टंडन एका वेगळ्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवैसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं होतं. या घटनेचा महाराष्ट्रातच नाही तर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आज, खासदार नवनीत राणा यांनी देखील याच मुद्दयावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला. आज जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी असं करण्याऱ्याला जिवंत गाढलं असतं, अशा शब्दात त्यांनी यावर संताप व्यक्त केला. आत यानंतर अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon ) हिनं देखील एक ट्वीट केलं आहे. सध्या तिचं हे ट्वीट सोशल मीडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे. रवीना टंडनं हिनं लेखक आनंद रंगनाथन यांचं ट्वीट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘आम्ही सहनशील आहोत, होतो आणि राहू. भारत एक स्वतंत्र देश आहे आणि इथे कोणालाही कोणाचीही पूजा करता येते. इथे सर्वांना समान अधिकार आहेत,’असं तिनं ट्वीट केलं आहे.

दुसऱ्या ट्वीटमध्ये रवीना म्हणाली आहे की, ’ माझ्या जन्मभूमीला असहिष्णु असे लेबल लावणे ही काही काळापूर्वीच एक फॅशन बनली आहे. यावरून आपण किती सहनशील आहोत आणि किती सहन करू शकतो हे सिद्ध होते. हे एक उदाहरण आहे. मग असहिष्णुता आहे कुठे?… असा प्रश्न तिनं या ट्वीटमधून केला आहे.

लेखक आनंद रंगनाथन यांचं ट्वीट नेमकं काय होते? लेखक आनंद रंगनाथन यांनी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवण्यासाठी गेलेल्या एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांचे फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत ते म्हणाले होते की, गुरू तेग बहादूर यांचा शिरच्छेद करणाऱ्या, संभाजी महाराजांचा शिरच्छेद करणाऱ्या, काशीला उद्ध्वस्त करणाऱ्या आणि 4.9 दशलक्ष हिंदूंची हत्या करणाऱ्या राक्षसाच्या कबरीवर प्रार्थना करणे हे चिथावणी देणारे मनोरुग्ण कृत्य आहे, असं ट्वीट लेखक आनंद रंगनाथन यांनी केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या