JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: राखी सावंतने दाखवली आपल्या दुबईच्या आलिशान घराची झलक; 'ड्रीम हाऊस' मधील प्रत्येक गोष्ट आहे रॉयल

VIDEO: राखी सावंतने दाखवली आपल्या दुबईच्या आलिशान घराची झलक; 'ड्रीम हाऊस' मधील प्रत्येक गोष्ट आहे रॉयल

बॉलिवूड (Bollywood) ड्रामा क्वीन अर्थातच राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या प्रचंड चर्चेत आहे.एक्स पती रितेशवर लावलेल्या आरोपांमुळे आणि बिझनेसमन आदिल खान दुर्रानीसोबतच्या (Aadil Khan Durani) तिच्या नवीन नात्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. राखी सावंत नुकतंच बॉयफ्रेंड आदिलसोबत दुबईला पोहोचली होती. आदिलने राखीला दुबईत एक आलिशान घर (Dubai Home) गिफ्ट म्हणून दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,17  जून-   बॉलिवूड   (Bollywood)  ड्रामा क्वीन अर्थातच राखी सावंत   (Rakhi Sawant)  सध्या प्रचंड चर्चेत आहे.एक्स पती रितेशवर लावलेल्या आरोपांमुळे आणि बिझनेसमन आदिल खान दुर्रानीसोबतच्या   (Aadil Khan Durani)  तिच्या नवीन नात्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. राखी सावंत नुकतंच बॉयफ्रेंड आदिलसोबत दुबईला पोहोचली होती. आदिलने राखीला दुबईत एक आलिशान घर  (Dubai Home)  गिफ्ट म्हणून दिलं आहे. आता राखी सावंतने आपल्या दुबई हाऊसची संपूर्ण झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने बाथरूमपासून आपल्या आलिशान बेडरूमपर्यंत सर्वकाही दाखवलं आहे. सध्या राखीचा हा व्हिडीओ प्रचंड पसंत केला जात आहे. अभिनेत्री-डान्सर राखी सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या व्यावसायिक आयुष्यापासून ते खाजगी आयुष्यापर्यंत सर्व गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. राखी नुकतंच बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत व्हेकेशनसाठी दुबईला पोहोचली होती. जिथे त्याने राखीसाठी आलिशान घर घेतलं आहे. आता राखीने आपल्या आलिशान घराची एक झलक दाखवली आहे. या घराचा थाटमाट पाहून लोक थक्क झाले आहेत.

संबंधित बातम्या

राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बेबी पिंक कलरच्या साडीत दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती चाहत्यांना तिच्या घराची झलक दाखवत आहे. व्हिडीओमध्ये राखी म्हणतेय, ‘तुम्हाला दुबईतील माझं आलिशान अपार्टमेंट बघायचं आहे का? सोबतच राखी म्हणत आहे, मला देवाकडून आता आणखी काही नको. राखी म्हणते की, असं अपार्टमेंट घेतल्यानंतर कोणालाही काहीही करण्याची गरज नाही. फक्त कपड्याची बॅग उचला आणि राहायला सुरुवात करा’’.परंतु व्हिडीओमध्ये दिसणारा हा तोच फ्लॅट आहे का जो आदिलने दिलाय याबाबत राखीने कोणताही खुलासा केलेला नाहीय. **(हे वाचा:** प्रियांका चोप्राने दाखवली लेक मालतीची झलक; आईच्या बर्थडेला शेअर केला Unseen Photo ) राखीने नुकतंच खुलासा करत सांगितलं होतं की, आदिलने दुबईत तिच्या नावावर एक फ्लॅट खरेदी केला आहे. आदिलने तिला BMW कारही गिफ्ट केल्याचं राखीनं सांगितलं होतं. हा व्हिडिओ पाहून चाहते विविध कमेंट्स करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या