JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'निक जोनसने चालत्या गाडीत धरले प्रियांकाचे केस...' व्हिडिओ होतोय व्हायरल

'निक जोनसने चालत्या गाडीत धरले प्रियांकाचे केस...' व्हिडिओ होतोय व्हायरल

नुकतंच प्रियांकाने नवरा निकसोबतचा एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही तासातच या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव सुरू झाला आहे.

जाहिरात

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै- अभिनेत्री प्रियांकाचे चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नवरा निक जोनस सोबत फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. या दोघांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा रंगलेली असते. तसंच मुलगी मालती मेरीचेही क्यूट फोटो व्हायरल होत असतात. नुकतंच प्रियांकाने नवरा निकसोबतचा एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही तासातच या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव सुरू झाला आहे. प्रियांका आणि निक विम्बल्डन पाहण्यासाठी गेले होते. प्रियांकाने यावेळी गडद हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. यावर तिने पोनीटेल हेअरस्टाईल केली होती. तर निक जोनास व्हाईट शर्ट, चेक्स सूटमध्ये दिसला. विम्बलडनवरुन परतत असताना चालू कारमध्ये प्रियांकानं एक व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये निक प्रियंकाची पोनी काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला ती काही करुन काढताच येत नाही. निकला असं करताना पाहून प्रियांकाला हसू आवरेना. तिने हसत हसतच हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. वाचा- बॉलिवूडमध्ये फ्लॉप होताच या अभिनेत्यांनी सोडला देश; परदेशात कमवतात कोट्यवधी प्रियांकाने याला सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, ‘पोनी टेलची गुंतागुंत’ असं कॅप्शनही देखील दिलं आहे.प्रियांकाने शेअर केलेल्या या व्हि़डिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. खास करून भारतीयांना बेस्ट जावई मिळाला आहे’ अशी एक कमेंट एकाने केली आहे. अनेकांनी या दोघांच्यातील प्रेमाचं कौतुक केलं आहे. अशी प्रियांका आणि निकची लव्हस्टोरी अमेरिकन गायक निक जोनस आणि प्रियांका चोप्रा हे सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या जोडीच्या लग्नाआधी त्यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली.निक-प्रियांकाची ओळख त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू होण्याच्या बराच काळ अगोदर झाली होती. कधी हे दोघं ‘गाला’च्या रेड कार्पेटवर एकत्र दिसले तर कधी निकच्या भावाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये. त्यामुळे या दोघांची भेट नेमकी कोणी घडवून आणली याचा अंदाज लावणं खूप कठीण होतं. पण बऱ्याच काळानं या गोष्टीचा खुलासा झाला की, निक आणि प्रियांकाची भेट WWE रेसलर ड्वेन जॉनसन म्हणजेच ‘द रॉक’मुळे झाली. 2017मध्ये ‘द रॉक’चे दोन मोठे सिनेमा रिलीज झाले. यातील एक ‘जुमांजी- वेलकम टू द जंगल’ आणि दुसरा होता, ‘बेवॉच’, रॉकमुळे या दोन्ही सिनेमातील कलाकारांच्या भेटी होत असत.

‘बेवॉच’मध्ये प्रियांकनं रॉक सोबत काम केलं होतं तर ‘जुमांजी’ध्ये निक रॉकसोबत दिसला होता. अनेकदा या सिनेमांच शुटिंग एकाच स्टुडिओमध्ये होत असे. त्यावेळी निक आणि प्रियांकाची भेट पहिली भेट झाली होती. त्यानंतर झालेल्या एका मुलाखतीत ‘जर ते दोघं एकमेकांसोबत खूश आहेत तर हो हे मीच केलं आहे.’ असं म्हणत रॉकने निक-प्रियांकाला एकत्र आणल्याचं कबूलही केलं होतं.

संबंधित बातम्या

खरंतर रॉकने त्यावेळी ही गोष्टी गंमत म्हणून सांगितली होती. मात्र या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झालेल्या भेटींनंतर निक आणि प्रियांकमधील जवळीक वाढली आणि रॉकचे हे दोन्ही सहकलाकार आता एकमेकांचे पति-पत्नी आहेत. रॉकच्या रिलेशनशिपविषयी बोलायचं झालं तर त्यानं 2007मध्ये आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला असून सध्या तो त्याची गर्लफ्रेंड लॉरेन हाशियानसोबत राहतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या