मुंबई, 14सप्टेंबर- नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा मेट गाला 2021**(Met Gala 2021)** ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी मेट गालामध्ये कलाकारांनाचा फॅशन चॉईस खूपच विचित्र होता. काही कलाकारांनी आपल्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांचं मन जिंकलं तर काहींनी सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. यामध्ये सर्वात जास्त अभिनेत्री किम कर्दाशियनने सर्वांनाच चकित केलं होतं.
किम कर्दाशियन यावेळी मेट गाला २०२१ मध्ये सर्वात जास्त चर्चेचा आणि हास्याचा विषय ठरली आहे. किम कर्दाशियनने यावेळी स्वतःला संपूर्ण एका काळया रंगाच्या कपड्यामध्ये झाकून घेतलं होत. इतकंच नव्हे तर किमने आपला चेहरासुद्धा त्या काळया रंगाच्या कपड्यामध्ये झाकून घेतला होता. हि सर्व विचित्र फॅशन पाहून सोशल मीडियावर अतरंगी फॅशन स्टार म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranvir Singh) सोशल मीडियावर ट्रेन्ड होऊ लागला आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असतो. रणवीर नेहमीच आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असतो. त्यामुळे रणवीर सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेन्ड होत आहे. युजर्सनि ट्विट करत म्हटलं आहे. बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड रणवीरला फॅशनच्या बाबतीत कोणी नाही मागे टाकू शकत. त्याच्या समोर चांगले चांगले लोक फिके आहेत. मेट गालानंतर रणवीर च्या जुन्या फोटोंवरून मोठ्या प्रमाणात मजेशीर मिम्स बनवण्यात येत आहेत.
नुकताच किम कर्दाशियनच्या मेट गाला लुकवर बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनेसुद्धा मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. करिनाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत, हे काय चाललंय असा प्रश्न केला होता. यामध्ये किम आणि दुसऱ्या बाजूला एक मिस्ट्री मॅन होता. तोसुद्धा पूर्णपणे काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये होता. त्यामुळे असा अंदाज लावण्यात येत होता. हा किमचा पती वेस्ट कान्ये तर नसेल. मात्र एका रिपोर्टनुसार कान्येनं मेट गालाला हजेरी लावली नव्हती.