JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूड अभिनेत्याचं 26 व्या वर्षी निधन; सलमान खानसह अनेक दिग्गजांबरोबर केलं होतं काम

बॉलिवूड अभिनेत्याचं 26 व्या वर्षी निधन; सलमान खानसह अनेक दिग्गजांबरोबर केलं होतं काम

सलमानबरोबर रेडी या चित्रपटामुळे मोहितला ओळख मिळाली होती. त्याच्या अकाली निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमधल्या अनेकांना धक्का बसला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मथुरा, 23 मे : ‘रेडी’, ‘जबऱ्या जोडी’, ‘बंटी और बबली’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता मोहित बाघेल याचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन झालं. त्याच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमधल्या अनेकांना धक्का बसला आहे. परिणिती चोप्रा, राज शांडिल्य, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर मोहितच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मोहितने सलमान खानबरोबर 2011 मध्ये आलेल्या रेडी या चित्रपटात चांगली भूमिका केली होती. या भूमिकेमुळे त्याला ओळख मिळाली होती. मोहित बाघेल गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होता. अखेर त्याची झुंज अपयशी ठरली. फक्त 26 व्या वर्षीच त्यानं जगाचा निरोप घेतला. उत्तर प्रदेशात मथुरा इथे त्याचं कॅन्सरमुळे निधन झालं.

2019 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या जबऱ्या जोडीमध्ये मोहितने परिणिती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याबरोबर काम केलं होतं.

अन्य बातम्या सलमानबरोबर 17 वर्षांपूर्वी झालेल्या भांडणावर विवेक ओबेरॉय म्हणतो, मला कोणावरही.. जगात वेगाने पसरतोय आणखी एक व्हायरस, विद्या बालननं सांगितलं कसं वाढतं संक्रमण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या