JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / The Kapil Sharma Show चा प्रसिद्ध कॉमेडियन रस्त्याशेजारी विकतोय चहा, Viral होतोय Video

The Kapil Sharma Show चा प्रसिद्ध कॉमेडियन रस्त्याशेजारी विकतोय चहा, Viral होतोय Video

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुनील ग्रोव्हर चहा विकताना (Sunil Grover Selling Tea) दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 एप्रिल: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) केवळ त्याच्या कॉमिक टायमिंगमुळेच नाही तर विविध चित्रपटांमध्ये केलेल्या वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी देखील प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Sunil Grover Viral Video) होत असतात. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुनील ग्रोव्हर चहा विकताना (Sunil Grover Selling Tea) दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहे. सुनीलने शेअर केला व्हिडीओ सुनील ग्रोव्हर त्याच्या इन्स्टाग्रामवर (Sunil Grover Instagram) विशेष सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. यावेळी त्याने रस्त्याशेजारी असणाऱ्या चहाच्या टपरीवर चहा बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याचा चहा बनवण्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतो आहे. लोकांना त्याची ही स्टाइल आवडत देखील आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने प्रसिद्ध नेटफ्लिक्सची वेबसीरिज ‘मनी हाइस्ट’ मधील Bella Ciao या गाण्याचे एक व्हर्जन वापरले आहे. शिवाय या गाण्याच्याच शब्दांतून विनोदनिर्मिती करत त्याने चहाला साजेसे कॅप्शनही दिले आहे.

संबंधित बातम्या

सुनीलचा साधेपणा व्हिडीओतून दिसतो आहे अशा आशयाच्या कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, ‘कलाकारांनी त्याच्यासारख वागलं पाहिजे आणि सामान्यांमध्ये राहिलं पाहिजे’, एकाने असं म्हटलं आहे की, ‘तुम्ही म्हणून माझे फेव्हरिट आहात’. काहींनी त्यांच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. काहींनी त्यांला ‘तू खरा आहेस’ असंही म्हटलं आहे. हे वाचा- अक्षय कुमार-जॅकलिन प्रमाणेच Alia Bhatt नाही आहे भारतीय! लग्नानंतर बदलणार नागरिकत्त्व? सुनील ग्रोव्हर सध्या त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी ऋषीकेश याठिकाणी शूटिंग करत आहे. काही दिवसांपूर्वी तो मुंबई एअरपोर्टवर देखील दिसला होता. त्याच्या या नव्या प्रोजेक्टबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. तो ‘द कपिल शर्मा शो’ किवा ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ मुळे जरी घराघरात पोहोचला असला तरी बॉलिवूडमध्येही त्याच्या अनेक भूमिका गाजल्या. ‘गब्बर इज बॅक’, ‘बागी’, ‘भारत’, ‘सनफ्लॉवर’, ‘पटाखा’, वेब सीरिज ‘तांडव’ यामधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या