मुंबई, 09 मे: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याची मुलगी आयरा (Aamir Khan Daughter Ira Khan) खानने रविवारी तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. आयरा खानच्या बर्थडे पार्टीचे अनेक फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती तिची आई रीना दत्ता, वडील आमिर खान आणि सावत्र भाऊ आझादसोबत केक कापताना दिसत आहे. आयराचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह बर्थडे एंजॉय करताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये तिचे मित्र-मैत्रिणीही दिसत आहेत. आयरा खानचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरने त्याच्या इंस्टाग्रामवर आयराच्या बर्थडे पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने आयराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हॅप्पी बर्थडे माय लव्ह (हार्ट इमोटिकॉन) मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बब्स.’ त्याने तीन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती केक कापण्याआधी मेणबत्ती विझवत आहे, एकामध्ये ती रेस्टॉरंमध्ये असून तिसऱ्या फोटोमध्ये पूलमध्ये थ्रोबॅक फोटो आहे.
आयराचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा फोटो ‘पॉप डायरी’च्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो पूल पार्टीनंतर असावा. ज्यामध्ये आमिर, आझाद आणि आमिर खानची पूर्वपत्नी रीना यांच्यासह केक कापताना आयरा दिसत आहे. या फोटोमध्ये आयरा बिकिनी परिधान केली असून ती मेणबत्त्या विझवताना दिसत आहे. ‘पॉप डायरी’च्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना, कॅप्शन लिहिले - “खान्ससाठी एक परिपूर्ण कौटुंबिक वेळ! सामान्यतः एकटा दिसणारा आमिर खान आज मुलगी आयरा खानचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत साजरा करताना दिसत आहे.’
वाढदिवसानिमित्त आयराने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. ज्यामध्ये ती मध्यरात्री पेस्ट्री कापताना दिसत आहे. यामध्ये तिचा मित्र डॅनिअल परेरा तिच्या वाढदिवसासाठी खास गाणं म्हणताना दिसला. एकंदरित तिने तिच्या मित्रपरिवार आणि कुटुंबासह वाढदिवस साजरा केला आहे.