JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आमिरच्या लेकीने शेअर केला क्लबमधला बोल्ड फोटो, सोशल मीडियावर होताय तुफान VIRAL

आमिरच्या लेकीने शेअर केला क्लबमधला बोल्ड फोटो, सोशल मीडियावर होताय तुफान VIRAL

या फोटोंमध्ये इरा फारच बोल्ड दिसत आहे. तिचे हे लेटेस्ट फोटो पाहून ती कोणत्याही अभिनेत्रीला हॉटनेसमध्ये मात देऊ शकते यावर कोणीही शंका घेणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 सप्टेंबर- बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. इराने अभिनयापेक्षा दिग्दर्शनाला पसंती दिली. सध्या ती मालिकांचं दिग्दर्शन करण्यात व्यग्र आहे. याशिवाय ती मॉडेलिंगमध्येही आपलं नशीब आजमावत आहे. इरा सोशल मीडियावर सक्रिय असून स्वतःचे लेटेस्ट फोटो ती सतत शेअर करत असते. नुकतंच इराने एक फोटोशूट केलं. यातलेच काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये इरा फारच बोल्ड दिसत आहे. तिचे हे लेटेस्ट फोटो पाहून ती कोणत्याही अभिनेत्रीला हॉटनेसमध्ये मात देऊ शकते यावर कोणीही शंका घेणार नाही. फोटोत इराने गडद मेकअपसोबत लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने फोटो शेअर करताना लिहिलं की, ‘सॅटरडे नाइट वाइब.’ इराने आधीच सांगितलं की तिला अभिनयात फारस स्वारस्य नाही. तिला दिग्दर्शनामध्ये तिला करिअर करायचं आहे. याआधी तिने नाटकाचे निर्मात्या सारिकासह फोटो शेअर केला होता.

इराने पोस्ट शेअर करताना म्हटलं की, ‘हा पाऊस कधी थांबावा असं मला कधीच वाटत नाही. आम्ही जेव्हाही सराव करतो तेव्हा पाऊस पडतो. पण माझी निर्माती मला कधीच पाऊसात चालू देत नाही. यावेळी मी त्यांना माझ्यासोबत यायला कसंतरी करून मनवलं.’ इरा ज्या नाटकाचं दिग्दर्शक करणार आहे ते ग्रीकमधील एका पौराणिक कथेवर आधारित आहे. यूरिपिड्स मेडिया असं या नाटकाचं नाव आहे. या नाटकात युवराज सिंगची पत्नी हेजल कीच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल सांगताना इराने हेजलसोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तिने हा म्हटलं. मैत्रिणीपेक्षाही एक अभिनेत्री म्हणून तुझ्यासोबत काम करण्यावर मी आनंदी आहे.’ देशमुख कुटूंबातील गृहक्लेश चव्हाट्यावर, जेनेलियाने रितेशला दिलं सडेतोड उत्तर शिक्षण घेण्यासाठी घासावी लागली होती भांडी, आता सनी देओलनं दिली गाण्याची संधी अखेर बॉयफ्रेंडला सोडून घरी परतली हृतिकची बहीण सुनैना रोशन सलमानसोबतच्या नात्याविषयी कतरिना म्हणते, मागच्या 16 वर्षांपासून आम्ही…

VIDEO: ‘बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता’; पवारांचा उदयनराजेंना टोला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या