JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंबंधी नितेश राणेंनी केली उद्धव ठाकरेंना 'ही' विनंती

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंबंधी नितेश राणेंनी केली उद्धव ठाकरेंना 'ही' विनंती

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित (The Kashmir Files) या चित्रपटाने दणक्यात कमाई केली आहे. आता भाजपचे आमदार नितेश राणे ( nitesh rane ) यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( cm uddhav thackeray ) यांना पत्र लिहून एक खास मागणी केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मार्च- 11 मार्च रोजी ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित (The Kashmir Files) या चित्रपटाने दणक्यात कमाई केली आहे. सध्या सगळीकडे या चित्रपाटाची चर्चा आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री केले आहे. आता भाजपचे आमदार नितेश राणे ( nitesh rane  ) यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( cm uddhav thackeray ) यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली आहे. याबद्दल ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, जम्मू काश्मीरमध्ये मुस्लीम दहशवादाला बळी पडलेल्या हिंदुंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा. मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे योग्य आणि खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला आधिकआधिक पाहता यावा यासाठी करमुक्त करावा..अशी विनंती त्यांनी या ट्वीटच्या माध्यामातून मुख्यमंत्री उद्धवा ठाकरे यांच्याकडे केली आहे.

संबंधित बातम्या

नितेश राणे यांच्या विनंतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच पल्लवी जोशी, प्रकाश बेलवाडी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, भाषा सुंबळी, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वी सरनाविक या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. वाचा- The Kashmir Files वरुन काँग्रेसचं वादग्रस्त ट्विट; आरएसएसवर साधला निशाणा द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. पूर्ण क्षमतेने चित्रपटगृह भरली असल्याने तिकीट बारीवर देखील चांगली कमाई झालेली पाहायला मिळाली. पहिल्याच दिवसात या चित्रपटाने 4.25 कोटींची कमाई करून आपला जल्लोष व्यक्त केला आहे. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या निर्मितीसाठी साधारण 12 कोटींचा खर्च आला तर याच्या प्रिंटिंग आणि जाहिरातींसाठी 2 कोटींचा खर्च करण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या