मुंबई, 25 ऑगस्ट: टिकटॉक स्टार आणि हरियाणाच्या भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली असून सोनाली यांचा मृत्यू संशयास्पद असून यामागे मोठ कटकारस्थान असल्याचा दावा सोनालीच्या भावानं केला होता. या प्रकरणी सोनालीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता सोनाली फोगटच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर गोवा पोलिसांनी सोनाली फोगट यांचा पीए सुधीर सांगवान आणि त्यांचा मित्र सुखविंदर यांच्याविरोधात आयपीसी कलम 302 अंतर्गत खुनाला गुन्हा दाखल केला आहे. सोनाली यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी बहिणीच्या मृत्यूसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनालीच्या भावानं सांगितलं, ‘सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीला जाळ्यात अडकवलं. सुखविंदरने तीन वर्षांपूर्वी सोनालीच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केला होता आणि त्याचा व्हिडिओही बनवला होता. त्यानंतर सुधीर आणि त्याचा मित्र सुखविंदर सातत्यानं सोनालीला ब्लॅकमेल करत होते. हे दोघं अधूनमधून सोनालीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळत होते. त्यामुळे अनेकदा तिची प्रकृती बिघडली होती. शेवटी या दोघांनी मिळून कट करत गोव्यात नेऊन तिची हत्या केली’.
हेही वाचा - Sonali Phogat Death : सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! कुटुंबियांची पोलिसात धाव, केलेत भयंकर दावे सोनाली यांच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल झाल्यानं आता या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असं दिसत आहे. पीए सुधीर सांगवान आणि मित्र सुखविंदर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर दोघांना कधीही अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोनाली यांचा नक्की मृत्यू झाला की घातपात हे देखील आता समोर येणार आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या खुनाच्या गुन्ह्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळणं आलं आहे. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाली फोगट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सोनाली यांचा भाचा महेंद्र फोगट सध्या त्यांच्या मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेल्या फॉर्मेलिटीज पूर्ण करत आहे. आज रात्री उशिरा सोनाली यांचा मृतदेह दिल्ली आणि त्यानंतर हिसारला पोहचू शकतो. सोनाली यांचा पोस्टमार्टम रिपोस्ट येण्यासाठी आणखी 4-5 तास लागणार आहेत. जोवर सोनालीचा पोस्टमार्टम रिपोर्ट येत नाही तोवर त्यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार नाही. तर दुसरीकडे पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याआधीच मित्र सुखविंदर आणि पीए सुधीर सांगवान यांच्या विरोधात गोवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.