JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आलिया पाठोपाठ बिपाशा बसू झाली आई; 43 व्या वर्षी दिला गोंडस मुलीला जन्म

आलिया पाठोपाठ बिपाशा बसू झाली आई; 43 व्या वर्षी दिला गोंडस मुलीला जन्म

बी टाऊनचे ग्लॅमरस कपल म्हणून ओळखले जाणारे बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी लक्ष्मी आली आहे.

जाहिरात

बिपाशा बसू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 नोव्हेंबर : अलीकडेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एका सुंदर मुलीला जन्म दिला. रणबीर आणि आलियानंतर आता आणखी एका जोडप्याने आनंदाची बातमी शेअर केली आहे. बी टाऊनचे ग्लॅमरस कपल म्हणून ओळखले जाणारे बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. या सुंदर जोडप्याने एका मुलीला जन्म दिला आहे. सध्या सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इंस्टा बॉलिवूडच्या रिपोर्टनुसार, बिपाशाने शनिवारी सकाळी एका मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षानंतर करण आणि बिपाशा आई-वडील झाले आहेत. ही बातमी समोर येताच बिपाशा आणि करण दोघांचेही चाहते खूप आनंदी झाले आहेत. बिपाशा बसूने ऑगस्टमध्ये तिच्या गरोदरपणाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून या कपलने अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. बिपाशाने अनेक मॅटर्निटी शूटही केले आहेत. तिने तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित काही व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या

वयाच्या 43 व्या वर्षी बिपाशाने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण आई-वडील झाले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टपाठोपाठ या कपलनेही एक मुलीला जन्म दिला आहे. या आनंदाच्या निमित्ताने या जोडप्याला चाहते आणि सेलिब्रिटींकडून खूप शुभेच्छा आणि प्रेम मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी बिपाशा बसूने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिला आणि करणला मुलगी हवी आहे. त्याच्या घरी मुलगी जन्माला यावी, अशी त्याची इच्छा आहे. आणि आता त्यांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे.

दरम्यान, बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहे. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 2016 मध्ये बिपाशा-करणचे लग्न झाले.  लग्नानंतर बिपाशाच्या गरोदर असल्याच्या बातम्या अनेकदा समोर येत आहेत. पण या वर्षी ऑगस्टमध्ये अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे गरोदरपणाची गोड बातमी शेअर केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या