अभिनयानंतर दीपिकाचं व्यवसाय क्षेत्रात पाऊल
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून अभिनेत्री दीपिका पादुकोण ओळखली जाते.
सतत चर्चेत असणारी दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
यावेळी ती तिच्या अभिनयामुळे नाही तर दुसऱ्या एका खास कारणामुळे चर्चेचा विषय ठरतेय.
अभिनेत्रीने तिचा सेल्फ केअर ब्रँड लॉन्च केला आहे, ज्याचे नाव आहे 82 ईस्ट.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दीपिकाने याबाबत माहिती दिली आहे.
'दोन वर्षांपूर्वी आम्ही एक आधुनिक सेल्फ केअर ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला', असं दीपिका म्हणाली.
आमचा ब्रँड स्टँडर्ड मेरिडियनपासून प्रेरित असल्याचं दीपिकाने सांगितलं.
हा ब्रँड लाँच करण्याचा उद्देश प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं आहे.
दीपिकाचा हा पहिला व्यवसाय नाही, याआधी अभिनेत्रीने स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती.