मुंबई, 06 मार्च : काही दिवसांपूर्वीच बिग बॉसचा 13 सीझन संपला. पण या सीझनची चर्चा अद्याप सोशल मीडियावर सुरूच आहे. अशातच आता एका बिग बॉस विनरवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा बिग बॉस विनर हिंदी नाही तर तेलूगु सीझन 3 चा विनर गायक राहुल सिप्लिगुंज आहे. बुधवार 04 मार्चला एक पबमध्ये राहुलवर हल्ला करण्यात आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 04 मार्चला राहुल त्याच्या काही मित्रासोबत एका पबमध्ये गेला होता. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्याला घेराव घालत अचानक मारहाण करायला सुरुवात केली. यामध्ये राहुलसोबत असलेल्या त्यांच्या मित्रांनाही मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ एक युजरनं ट्विटरवर शेअर केला आहे ज्यात हे लोक कशाप्रकारे राहुलला मारहाण करत आहे. तसेच त्याच्या डोक्यावर काचेच्या बाटल्या फोडल्या ते स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कडाक्याच्या थंडीत असं झालं होतं ‘राजा हिंदुस्तानी’च्या KISSING सीनचं शूट!
या घटनेबाबत राहुलन प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ‘सुरुवातीला या लोकांनी मी आणि माझ्या मित्रांशी वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला की या लोकांनी आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली. जेव्हा मी त्यांना विरोध करायचा प्रयत्न केली तेव्हा ते आणखीच संतापले.’ या घटनेत राहुलला काही किरकोळ दुखापत झाली आहे. यांच्यातील वाद वाढल्यानंतर त्या पबमधील एतर व्यक्ती आणि सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करत राहुलला वाचवलं. या प्रकरणी गतिबोवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Bollywood मधलं धक्कादायक वास्तव; श्रुती हासनने सांगितले तिचे अनुभव
राहुल सिप्लिगुंज हा बिग बॉस तेलूगु 3चा सर्वाधिक चर्चेत राहिलेला स्पर्धक आणि विनर आहे. हा शो जिंकल्यानंतर त्याला 50 लाख रोख रक्कम जिंकली होती. रिअलिटी शो विनर असण्यासोबत राहुल एक गायक, गीतकार आणि संगीतकार सुद्धा आहे. 2009 मध्ये तो पहिल्यांदा गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. याशिवाय त्यानं काही साउथ सिनेमातही काम केलं आहे. ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका…’ मालिका वादात शशांक केतकरची उडी