JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 4 Finale : बिग बॉसच्या विजेतेपदावरून किरण मानेंचा पत्ता कट

Bigg Boss 4 Finale : बिग बॉसच्या विजेतेपदावरून किरण मानेंचा पत्ता कट

बिग बॉसच्या या सीजनचाआज महाअंतिम सोहळा पार पडला आहे. या पर्वाचा विजेता कोण बनणार? बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हातात येणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले होते. आता अखेर बिग बॉसच्या विजेत्याचं नाव समोर आलं आहे.

जाहिरात

बिग बॉस मराठी 4

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08जानेवारी : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक म्हणजे ‘बिग बॉस’ होय. या शोला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत असते. शोमध्ये सतत होणारे वादविवाद, राडे, मैत्री, प्रेम या गोष्टी प्रेक्षकांना आकर्षित करुन घेत असतात. यंदा बिग बॉस मराठीचा चौथा सीजन सुरु झाला होता. बिग बॉसच्या या सीजनचा आज महाअंतिम सोहळा पार पडला आहे. या पर्वाचा विजेता कोण बनणार? बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हातात येणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले होते. आता अखेर बिग बॉसच्या टॉप २ स्पर्धकांची नावं समोर आलं आहे. टॉप ३ स्पर्धकात किरण माने,अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर हे दोन स्पर्धक टॉप २ मध्ये गेले आहेत. आता या दोघातून विनर कोण होणार याकडे स्पर्धकांचं लक्ष लागलं आहे. किरण माने यांनी बिग बॉसचा हा सिझन गाजवला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. किरण मानेंच्या एलिमेंशनमुळे त्यांचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. हेही वाचा - Avaneet Kaur: तुनीषाची जागा घेणार नाही अवनीत कौर; समोर आलं मोठं कारण बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन प्रचंड गाजला होता. यातील सर्व स्पर्धकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद मिळाला होता. अभिनेता स्पर्धक सांगलीचा विशाल निकम बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनलासुद्धा प्रेक्षकांचं प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. तर काही या सीजनवर टीका करत आहेत. या सीजनला संमिश्र प्रतिक्रिया मिळालेल्या दिसून येत आहेत. बिग बॉस मराठीच्या या चौथ्या सीजनच्या महाअंतिम सोहळ्याला आता फक्त एक दिवस उरला आहे. परंतु विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

2022 या वर्षात सगळ्यात जास्त वादग्रस्त राहिलेले कलाकार म्हणजे अभिनेते किरण माने.  आता  किरण माने बिग बॉस मराठीच्या  घरात सहभागी झाले आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेते किरण माने बिग बॉस मराठीच्या सीझन 4 मधील सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक असणार आहेत. अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून तडकाफडकी काढण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांनी आपण राजकीय भूमिका मांडली म्हणून आपल्याला काहीही पूर्व सूचना न देता मालिकेत काढून टाकण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांवर केला होता. त्यांनतर पत्रक जाहीर करत वाहिनीने किरण माने गैरवर्तवणूक करत होते. वारंवार सांगूनही त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं होतं. किरण माने यांनी बिग बॉसचा हा सिझन गाजवला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. किरण मानेंच्या एलिमेंशनमुळे त्यांचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या