JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Apurva Nemlekar : अपूर्वाने अखेर पूर्ण केला आईला दिलेला तो शब्द; समोर येताच रडतच म्हणाली...

Apurva Nemlekar : अपूर्वाने अखेर पूर्ण केला आईला दिलेला तो शब्द; समोर येताच रडतच म्हणाली...

तब्बल 80 दिवसांनंतर आईला पाहिल्यावर अपूर्वा एखाद्या लहान मुलासारखी ढसाढसा रडायला लागली. एवढंच नाही तर तिने आईला एक वचन दिलं होतं. ते देखील तिने पूर्ण केलं आहे.

जाहिरात

बिग बॉस मराठी 4

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर : टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त्र शो म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात ते म्हणजे बिग बॉस. बिग बॉस हिंदी नंतर मराठीतही बिग बॉस सुरू करण्यात आलं. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनबाबत प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पाहून फेअर आणि अनफेअरवरून सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलिंग सुरू आहे. आता या आठवड्याच्या चावडीवर सदस्यांना त्यांचे नातलग भेटणार आहेत. अपूर्वा आणि अमृताला भेटायला तिची आई येणार आहे तर किरण मानेची बायको त्यांना भेटायला येणार आहे. आपल्या घराच्या माणसांना पाहताच सगळे सदस्य खूपच भावुक झाले. अपूर्वा ढसाढसा रडतच आईच्या गळ्यात पडली. अपूर्वा कायम म्हणते की  तिला आईशिवाय दुसरं कोणी नाही. पहिल्यांदाच ती आईपासून एवढे दिवस दूर राहिली. आता तब्बल 80 दिवसांनंतर आईला पाहिल्यावर अपूर्वा एखाद्या लहान मुलासारखी ढसाढसा रडायला लागली. एवढंच  नाही तर तिने आईला एक वचन दिलं होतं. ते देखील तिने पूर्ण केलं आहे. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: एरवी राखीच्या मागेपुढे करणाऱ्या किरण मानेंनी बायकोला समोर पाहताच दिली ही रिऍक्शन बिग बॉस मराठीचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यात अपूर्वाची आई आणि मामा तिला घरात भेटायला आले आहेत. अपूर्वा आईला पाहताच भावुक होते. अपूर्वाने आपल्या आईला एक दिवस तरी बिग बॉसच्या घरात आणण्याचा शब्द दिला होता. आईला समोर पाहताच ती भावुक झाली आणि म्हणाली मी अखेर तुला दिलेला शब्द खरा करून दाखवला.

संबंधित बातम्या

बिग बॉसच्या घरातील सध्या सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. यात तिने शेवंता हे पात्र साकारले होते. तिने साकारलेली शेवंता प्रचंड लोकप्रिय झाली. आता बिग बॉसच्या घरातदेखील अपूर्वा कायम चर्चेत राहते. अनेक सदस्यांशी ती पंगा घेते पण सोबतच काही  चांगली मैत्रीण देखील आहे. आता बिग बॉसच्या तिच्याकडे चाहते विजेती म्हणून पाहत आहेत. अपूर्वा नेमळेकरच्या खाजगी आयुष्याविषयी नेहमीच चर्चा होते. आता बिग बॉसच्या घरात तिने आपल्या आयुष्यातील मोठ्या दुःखाचा उलगडा केला आहे. आपल्या आयुष्यात खूप दुःख आहे पण या घरात खूप वर्षांनी मी पहिल्यांदा एवढं मोकळेपणानं हसले असं अपूर्वा नेहमीच म्हणते.

बिग बॉस मराठीच्या घरात आता किरण माने, प्रसाद जवादे अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, अरोह वेलणकर हे सदस्य राहिले आहेत. घरातील 77 वा दिवस पार पडला आहे. त्यामुळे केवळ 2 आठवड्यांचा कालावधी उरला आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच बिग बॉस मराठी 4 प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस मराठी 4 चा ग्रँड फिनाले 8 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. कलर्स मराठी वाहिनीनं अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र आता बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या