JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi च्या घरातून तृप्ती देसाई Out; सदस्यांना अश्रू अनावर

Bigg Boss Marathi च्या घरातून तृप्ती देसाई Out; सदस्यांना अश्रू अनावर

बिग बॉस मराठी 3 च्या (bigg boss marathi 3) घरातून आज तृप्ती देसाई या बाहेर पडल्या आहेत. यावेळी तृप्ती देसाई (trupti desai) भावूक झालेल्या दिसल्या. घरातील सदस्य देखील तृप्ती ताईंना निरोप देताना भावूक झाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 नोव्हेंबर : बिग बॉस मराठी 3 च्या (bigg boss marathi 3) घरातून आज तृप्ती देसाई या बाहेर पडल्या आहेत. यावेळी तृप्ती देसाई (trupti desai) भावूक झालेल्या दिसल्या. घरातील सदस्य देखील तृप्ती ताईंना निरोप देताना भावूक झाले. यावेळी तृप्ती देसाई यांनी सर्वांना चांगलं खेळण्याचा सल्ला दिला. तसेच कधीही एक कॉल करा तृप्ती देसाई तुम्हाला नक्की मदत करणार, असं अश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना भेटायला गेले कलर्स मराठी परिवरातील सदस्य. जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा आणि मल्हार यांनी घरातील सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. मीरा – जय, विशाल – मीरा आणि दादूस – मीनल – नीथा यांनी एक से बडकर एक performance सादर केले. तर, विशाल आणि सौरभ यांनी त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या. घरातील सदस्यांचे त्यांनी कौतुकदेखील केले. याचसोबत सदस्यांना त्यांच्या घरून आलेले गिफ्ट्स मिळाल्याने दिवाळीचा हा आनंद द्विगुणित झाला. Bigg Boss Marathi च्या घरातून तृप्ती देसाई Out ; सदस्यांना अश्रू अनावर

Bigg Boss Marathi च्या घरातून तृप्ती देसाई Out ; सदस्यांना अश्रू अनावर

या आठवड्यात नॉमिनेशन मध्ये आलेल्या सदस्यांमध्ये काल मीनल आणि विशाल सेफ झाले. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे स्नेहा, विशाल यांना सांगितली. विकास, जय आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. आता जय, सोनाली आणि तृप्ती देसाई या तीन जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. वाचा :  आलिया- रणबीर पोहचले नवीन घराचं बांधकाम पाहण्यास; कपड्यांवरून झाले ट्रोल जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले महेश मांजरेकरांनी सांगितले. तृप्ती देसाई यांना या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. घरातील सदस्यांना अश्रु अनावर झाले. कसा असणार नवा आठवडा ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सीजन कलर्स मराठीवर.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या