JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 2- वैशालीने सुरेखा ताईंवर केला चोरीचा आरोप, नेहाने लावली आग

Bigg Boss Marathi 2- वैशालीने सुरेखा ताईंवर केला चोरीचा आरोप, नेहाने लावली आग

Bigg Boss Marathi 2- एकाला चुकीचं दाखविण्यासाठी आणि आपल्या टीममधील सदस्यच कसा बरोबर आहे, त्याचे समर्थन करण्यसाठी सगळेच एकमेकांशी भांडायला लागतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता स्पर्धकांचे वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कधी कधी शुल्लक गोष्टीवरून हे स्पर्धक वाद घालतात. एकाला चुकीचं दाखविण्यासाठी आणि आपल्या टीममधील सदस्यच कसा बरोबर आहे, त्याचे समर्थन करण्यसाठी सगळेच एकमेकांशी भांडायला लागतात. यात अपवाद ठरतात त्या सुरेखा ताई. आतापर्यंत त्यांचे फारसे वाद झाले नाहीत. वीणा आणि अभिजीत बिचुकले यांच्यासोबतचे वाद सोडले तर  त्यांचा लक्षात राहील असा वाद क्वचितच झाला. आज बिग बॉस मराठीच्या घरात एक वेगळा टास्क रंगणार आहे . यात दोन टीममध्ये सदस्यांची विभागणी केली जाणार आहे. BB हॉटेल या टास्कमध्ये वैशाली आणि सुरेखाताईंमध्ये वाद होणार आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे ही अभिनेत्री, तीन वर्षांपूर्वीच दिला मुलीला जन्म सुरेखाताईंनी वैशालीने ठेवलेली पपई घेतली. त्यावर वैशालीने आक्षेप घेतल्यावर सुरेखा म्हणाल्या की, दोघींनी अर्धी घेऊ. पण वैशालीला हे काही मान्य नव्हतं. या भांडणात नेहाही मध्ये पडली. तिने सुरेखा ताईंना वैशालीने पपई आधीच घेतली होती. तुम्हाला हवी होती तर आधी का नाही घेतली असा प्रश्न विचारला. नेहा आणि वैशाली दोघांनीही त्यांना पपई परत देण्यास सांगितले. पण मी नाही देणार, तुम्हाला काय करायचे ते करा, असं सुरेखाताई म्हणाल्या. त्यावर वैशालीने सुरेखा ताईंवर चोरीचा आळ घातला. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज खास अतिथी येणार आहेत. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम मिळाले. त्यातील सदस्य, त्यांची मैत्री, त्यांनी केलेले टास्क अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता त्याच पर्वातील काही सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत. पहिल्या सिझनमधील सई, पुष्कर, स्मिता आणि शर्मिष्ठा**.** पुन्हा त्याच आठवणी, गप्पा, भांडण, टास्क त्यांना आठवणार हे नक्की. विराट कोहली नाही तर ‘हा’ क्रिकेटर आहे हृतिक रोशनचा मोस्ट फेवरेट आज घरामध्ये बिग बॉस सदस्यांना नवा टास्क देणार आहेत आणि ज्यासाठीच पहिल्या पर्वाचे सदस्य घरामध्ये येणार आहेत. काल सगळे सदस्य बंद हॉटेलमध्ये अडकले होते आणि वेगवेगळी कार्य यशस्वीरीत्या पार पाडून सदस्यांनी या हॉटेलचा संपूर्ण ताबा मिळवला होता. आज हेच बंद पडलेलं “BB हॉटेल” घरातील सदस्य पुन्हा नव्याने सुरु करणार आहेत. या हॉटेलचे नाव सदस्यांनी “आईचा विसावा” असे ठेवले आहे. आता सदस्यांना घरामध्ये येऊन एक महिना उलटला आहे आणि त्यामुळेच बाहेरच्या जगाशी, बाहेरच्या माणसांशी, घटनांशी त्यांचा काहीच संबंध नाहीये. या टास्कमुळे घरातील सदस्यांना खास पाहुण्यांना भेटण्याची संधी बिग बॉसनी आज सदस्यांना दिली… या सदस्यांचे घरातील सदस्यांनी जंगी स्वागत केले… आता बघूया पुढे घडते. VIDEO VIRAL- ढसाढसा रडला कार्तिक आर्यन, सारा राहिली बघत SPECIAL REPORT: …आणि मैदानात गायीनं घेतला फुटबॉलचा ताबा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या