JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 2- आईसमान सुरेखांबद्दल अभिजीत बिचकुलेंनी नेहाला सांगितलं असं काही...

Bigg Boss Marathi 2- आईसमान सुरेखांबद्दल अभिजीत बिचकुलेंनी नेहाला सांगितलं असं काही...

Bigg Boss Marathi 2 अभिजीत बिचुकले हे सुरेखा पुणेकरांना घरामध्ये त्यांची आई मानतात. त्या आईच्या जागी आहेत असे त्यांनी बऱ्याचदा बोलूनही दाखविले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जून- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कधी कोणाच्या बाजूने बोलेल आणि कधी पाठ फिरताच कोण वार करेल काही सांगता येत नाही. तसंच कोणता सदस्य कोणाला भडकवायचा प्रयत्न करेल हे कळणंही अवघड असतं. अभिजीत बिचुकले हे सुरेखा पुणेकरांना घरामध्ये त्यांची आई मानतात. त्या आईच्या जागी आहेत असे त्यांनी बऱ्याचदा बोलूनही दाखविले आहे. मागील आठवड्यामध्ये झालेल्या WEEKEND चा डावमध्ये सुरेखा ताईंनी अभिजीत बिचुकले यांची शाळा घेतली. ते कुठे चुकत आहेत, शिवीगाळ करतात यावर त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यांना खडसावले. आज नेहाला अभिजीत सुरेखाबद्दल काही गोष्टी सांगताना दिसणार आहे. बिचुकले यावेळी म्हणाले की, “सुरेखा ताईंना मी पहिल्या पासून ओळखतो. त्या वेगळ्याच मानसिकतेच्या आहेत. आपला शो फ्लॉप करण्याचं त्यांच्या डोक्यात आहे. काल झालेल्या प्रकारावरून रुपालीने माफी मागितली आणि मीदेखील तिची माफी मागितली. हे सर्व होत असताना त्या तिथे होत्या आणि त्या मला म्हणाल्या की पहिल्यापासून मला ही नको होती.” आता यावर नेहाचं काय म्हणणं असेल.. नेहाचा यावर विश्वास बसेल का… पुढे काय होईल… या सर्व रंजक गोष्टी आजच्या भागात पाहायला मिळणार आहेत. या स्टार कपलने ४० दिवस साजरं केलं हनिमून, प्रेग्नंसीच्या प्रश्नावर दिलं उत्तर कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. यात टीम A आणि टीम B अशा टीम करण्यात आल्या आहेत. नेहा शितोळे टीम A आणि विद्याधर जोशी टीम B चे मॅनेजर असणार आहेत तर वैशाली म्हाडे संचालक असणार आहे. आता या टास्क मध्ये कोण जिंकणार हे पाहणं रंजक असणार आहे. या आठवड्यामध्ये सही रे सही या टास्कमध्ये विणा जगताप, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर, अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले तर शिवला घरातील सदस्यांनी नॉमिनेट केल्याने तो देखील थेट नॉमिनेट आहे. याशिवाय हिनाचा घरातील पहिला आठवडा असल्यामुळे आणि वैशाली घराची कॅप्टन असल्याने त्या या आठवड्यात सुरक्षित आहेत. ‘माझी फिगर पाहा,’ आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने भाजपच्या महिला नेत्या भडकल्या दरम्यान, एक डाव धोबीपछाड या टास्कमध्ये नेहा आणि विद्याधर मॅनेजर असल्याने स्वत:ची टीम कशी जिंकेल याच प्रयत्नात असणार आहेत. नेहाच्या टीमला वैशाली म्हाडे म्हणजेच टास्कच्या संचालिकेवक संशय आहे. त्यांना नेमकी असा संशय का आहे ते आज कळेल. काल शेरास सव्वा शेर या टास्कमध्ये रुपाली भोसले आणि अभिजीत बिचुकलेमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अभिजीत यांनी मला घराबाहेर जायचे आहे असे देखील सांगितले. कोण पहिल्या नंबरवर रहाणार यावरून किशोरी आणि अभिजीत केळकर यांच्यामध्ये देखील वादावादी झाली. तर नेहा आणि सुरेखा ताईमध्ये देखील जेवणावरून बराच वाद झाला. नेहाने वैशालीला सांगितले तिला किचन टीममध्ये रहायचे नाही. तर परागने किशोरी, रुपाली यांचा ग्रुप सोडण्याचा निर्णय घेतला. आता परत तुमच्या ग्रुपमध्ये येणं अशक्य आहे असं देखील तो म्हणाला. रुपाली आणि किशोरीने त्याला बरच समजविण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. हृतिकची बहीण सुनैना रोशन म्हणाली, माझं समर्थन कंगनाला! VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या