JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : वेड्या आईची वेडी माया..आईचा आशीर्वाद घेऊन शिव निघाला खतारोंके खिलाडी जिंकायला!

VIDEO : वेड्या आईची वेडी माया..आईचा आशीर्वाद घेऊन शिव निघाला खतारोंके खिलाडी जिंकायला!

आता शिव ठाकरे रोहित शेट्टीच्‍या खतरों के खिलाडी 13 सह टेलिव्हिजनवर परत येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

जाहिरात

shiv thakare

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6मे- बिग बॉसचा 16 वा सिझन चांगलाच हिट ठरला. यात शिव ठाकरेने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. शिवने शेवट्पर्यंत मजल मारत फर्स्ट रनर अप ठरला. त्याने विजेतेपद जिंकलं नसलं तरी प्रेक्षकांचं मन नक्कीच जिंकलं. बिग बॉस 16 नंतर शिव ठाकरेचा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्याला आता नवीन शो मध्ये पडद्यावर पुन्हा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. तो नवीन प्रोजेक्टमध्ये काम देखील करत आहे. आता शिव ठाकरे रोहित शेट्टीच्‍या खतरों के खिलाडी 13 सह टेलिव्हिजनवर परत येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. शिव खतरों के खिलाडी 13 साठी सज्ज झाला असुन त्याचा प्रवास देखील सुरु झाला आहे. मात्र त्यापुर्वी त्याच्या आईचा आणि त्याचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात शिवची आई त्याचे औक्षण करत आहे. शिव आता आईचा आशीर्वाद घेवुन खतरों के खिलाडीचा 13 वा सिझन जिंकण्यासाठी निघाला आहे. चाहत्यांनी देखील शिवला याननवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा- सगळ्यात महागडे सीन असलेले 8 चित्रपट; एकाच्याच खर्चात बनतील KGF सारखे 10 सिनेमे यापूर्वी शिव ठाकरेने सिद्धीविनायक दर्शन देखील घेतलं होते. शोमध्ये जाण्यापूर्वी त्याने बप्पाचे देखील अशीर्वाद घेतले आहेत. त्यावेळी मंदिराबाहेर येताच सर्वांना प्रसाद देखील वाटला होता. मागच्या काही दिवसात शिव ठाकरेची लोकप्रियता वाढली आहे. अनेक जणांना शिवसोबत काम करायचे आहे, शिवाय त्याला पाहण्यासाठी व त्याची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात.

संबंधित बातम्या

काही दिवसापूर्वी शिव ठाकरेने नवीन कार घेतली होती. याचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.एका मुलाखतीत शिवने गाडी घेण्याविषयी खुलासा केला होता. यावेळी बोलताना तो म्हणाला होता की, ‘बिग बॉसनंतर माझं आयुष्य नक्कीच बदललं आहे. आता मी गाडीही बूक केली आहे. हे सरप्राइज होतं. पहिल्यांदाच मी हे सगळ्यांसमोर सांगत आहे. मी कामासाठी बाहेर पडलो तेव्हा मी माझ्या मित्राला म्हटलं की, तुझं काम आहे तर तू कार घेऊन नको येऊ. मी माझ्या कामासाठी रिक्षाने जातो.

कारण मी माझ्या मित्राच्या कारने प्रवास करतो. रिक्षाने जात असताना मला बघून सगळेच जण थांबत होते. ‘बिग बॉस मराठी’नंतरही आयुष्य बदललं. पण आता त्यापेक्षाही अधिक आयुष्य बदललं आहे.’ अश्या भावना त्याने व्यक्त केल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या