एजाज खान
मुंबई, 19 मे : ‘बिग बॉस सीझन 7’ फेम अभिनेता एजाज खान सध्या चर्चेत आला आहे. या अभिनेत्याविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. एजाज खानला दोन वर्षांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. इतकी वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर शुक्रवार 19 मे रोजी त्याची अखेर सुटका झाली आहे. आज संध्याकाळी 6.40 च्या सुमारास त्याची आर्थर रोड कारागृहातून सुटका होणार आहे. एजाज खानला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्याचे वृत्त आहे. इतके दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर आज 19 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. एजाज खानला 2 वर्षांनंतर जामीन मिळाला आहे. गेली दोन वर्ष अभिनेता जेलची हवा खात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एजाज खानची आज संध्याकाळी 6.30 वाजता मुंबईतील आर्थर रोड जेलमधून सुटका होणार आहे. या बातमीनंतर एजाज खानच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याच्या सुटकेनंतर त्याची पत्नी आयशा खान म्हणाली की, ‘तिच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे. एजाजला पाहण्यासाठी त्याचे कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत आहेत. सगळ्यांना त्याची खूप आठवण येत होती.’
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने एजाज खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्याच्यावर तो अंमली पदार्थांच्या तस्करीत सामील असल्याचा आरोप होता. ज्यामध्ये तो अंमली पदार्थांच्या गोळ्या विकत असल्याची माहिती देखील समोर आली होती. तसेच तो तरुण मुला-मुलींचे अमली पदार्थ पुरवून त्यांचे शोषण करत असल्याचा देखील आरोप त्याच्यावर होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) एप्रिलमध्ये एजाज खानच्या घरावर छापा टाकला होता तेथून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. संकर्षण कऱ्हाडेवर गुंडाचा हल्ला; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला ‘माझा १ (एक) हात जखमी झालाय..’ एजाजवर तो बटाटा टोळीशी संबंधित असल्याचा आरोप होता. एनसीबीने एप्रिल 2021 मध्ये एजाज खानच्या घरावर छापा टाकला होता. तेथून ड्रग्ज जप्त करण्यात आले. एजाज खान जयपूरहून परतत असताना त्याचवेळी विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले होते कि, ‘त्याच्या घराच्या झडतीदरम्यान 4.5 ग्रॅम अल्प्रोझोलच्या 31 गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच एजाजला बटाटा टोळीशी संबंधित असल्यामुळे अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. एजाज आता लवकरच तुरुंगातून बाहेर पडणार असून त्याचे चाहते आनंदी झाली आहेत. एजाज खानने आजवर अनेक प्रसिद्ध शोमध्ये काम केले आहे. एजाज खान आजपर्यंत ‘दिया और बाती हम’, ‘मिट्टी की बनो’, ‘करम अपना अपना’ सारख्या अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे. तसेच तो ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘बिग बॉस’ सारख्या टीव्हीच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शोचाही भाग राहिला आहे.