JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 16: पानाच्या टपरीवर काम, दूध विक्री; शिव ठाकरेचा खडतर प्रवास वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

Bigg Boss 16: पानाच्या टपरीवर काम, दूध विक्री; शिव ठाकरेचा खडतर प्रवास वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

सध्या बिग बॉस हिंदीमुळे शिव ठाकरे प्रचंड चर्चेत आहे. इतकंच नव्हे तर तो सतत सोशल मीडियावर ट्रेंडदेखील होत आहे.

जाहिरात

शिव ठाकरे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 ऑक्टोबर-   टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो असणाऱ्या बिग बॉस ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. यंदा सीजनच्या पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांना एकापेक्षा एक धक्के बसत आहेत. या सीजनमध्ये बिग बॉसच्या घरात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. तरीसुद्धा काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात उत्तम खेळ खेळत प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. त्यातीलच एक स्पर्धक बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीजनचा विजेता आणि बिग बॉस सोळाचा स्पर्धक म्हणजेच शिव ठाकरे होय. सध्या बिग बॉस हिंदीमुळे शिव ठाकरे प्रचंड चर्चेत आहे. इतकंच नव्हे तर तो सतत सोशल मीडियावर ट्रेंडदेखील होत आहे. मराठमोळ्या शिव ठाकरेने बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच आपली खास ओळख निर्मण करायला सुरुवात केली आहे. या शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिव प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. फक्त प्रेक्षकच नव्हे तर होस्ट-अभिनेता सलमान खानदेखील शिवच्या परफॉर्मन्सने इम्प्रेस झाला आहे. सलमान खानने पहिल्याच आठवड्यात शिव ठाकरेचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यामुळे सर्वांचं लक्ष शिव ठाकरेकडे लागलं आहे. तसेच शिव ठाकरेच्या खाजगी आयुष्याबाबतही जाणून घेण्याची अनेकांची इच्छा आहे. आज आपण अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याबाबत काही गोष्टी जाणून घेणार आहोत. (हे वाचा: Bigg Boss 16: ‘लोकांनी मला कचरा…; बिग बॉसच्या घरात अब्दु रोजिकला आठवले ‘ते’ दिवस **)** सध्या बिग बॉसमुळे प्रचंड चर्चेत असलेला शिव एकेकाळी ‘रोडीज’ या लोकप्रिय शोमध्ये झळकला आहे. यामध्ये तो एक स्ट्रॉंग स्पर्धक होता. शिवने एमटीव्हीवरील ‘रोडीज’ याच लोकप्रिय रिऍलिटी शोमधून टीव्हीवर पदार्पण केलं होतं. या शोमुळेसुद्धा तो चांगलाच प्रसिद्धीस आला होता. या शोमध्ये शिव मेंटॉर रणविजय सिंगच्या टीमचा सदस्य होता. तत्पूर्वी ऑडिशन राउंडला शिवने रणविजयसह सर्वच परीक्षकांचं मन जिंकलं होतं. त्याच्या साध्याभोळ्या राहणीमानाच्या सर्वच प्रेमात पडले होते. इतकंच नव्हे तर त्याचा स्ट्रगल पाहून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आले होते. शिव ठाकरेने रोडीजच्या ऑडिशनमध्ये सांगितलं होतं की, ‘त्याचे वडील एक पान दुकान चालवत होते. तो आपल्या वडिलांसोबत या दुकानात काम करत असे. त्याची बहीणदेखील या कामात मदत करत असे. इतकंच नव्हे तर घर चालवण्यासाठी त्याच्या बहिणीने आणि त्याने वृत्तपत्रे आणि दूधदेखील विकलं आहे. त्यानंतर शिवणे डान्स क्लास घेण्यास सुरुवात केली होती. यामध्ये त्याला 10 ते 22 हजारांपर्यंत पैसे मिळत असत. याचदरम्यान शिवने फिटनेसकडे लक्ष दिलं. आणि नंतर रोडीजमध्ये एन्ट्री केली होती.

शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा राहणारा आहे. त्याने फारच कमी वेळेत आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. रोडीजनंतर शिव मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनमध्ये सहभागी झाला होता. यामध्येसुद्धा तो प्रचंड लोकप्रिय झाला होता. शिव ठाकरे या सीजनचा विजेतादेखील ठरला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या