JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 16: शालीन आणि टीना करत होते चक्क 'बेबी प्लॅनिंग'; भांडता-भांडता उघड झालं गुपित

Bigg Boss 16: शालीन आणि टीना करत होते चक्क 'बेबी प्लॅनिंग'; भांडता-भांडता उघड झालं गुपित

शालीन आणि टीनामधील अंतर दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. येत्या एपिसोडमध्ये देखील दोघांमधलं भांडण पाहायला मिळणार आहे. पण त्यांच्या भांडणांमध्येच एक महत्वाची गोष्ट उघड होणार आहे.

जाहिरात

बिग बॉस 16

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जानेवारी: बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅन आणि अर्चना गौतम हे स्पर्धक अनेकदा भांडताना दिसतात. दोन्ही स्पर्धक कधी घरातील कामाबद्दल तर कधी पालकांबद्दल अपशब्द वापरताना दिसतात. शनिवारच्या एपिसोडमध्ये, होस्ट सलमान खानने एमसी स्टॅन आणि अर्चना गौतम या दोघांना त्यांच्या भांडणासाठी फटकारले. त्याच्या चुकांमुळे त्याला खूप फटकारले. याशिवाय शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्या नात्याबद्दल घरातील सदस्यांसमोर अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. त्याचवेळी, रविवारच्या एपिसोडमध्ये आठ स्पर्धकांचे कुटुंबीय बिग बॉस शोमध्ये प्रवेश करणार आहेत. यानंतर कुटुंबातील सदस्य आठवडाभर एकत्र राहतील. शालीन आणि टीनामधील अंतर दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. येत्या एपिसोडमध्ये देखील दोघांमधलं भांडण पाहायला मिळणार आहे. बिग बॉस 16 च्या रविवारच्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये शालीन आणि टीना बागेच्या टेरेसवर बसले आहेत. टीना त्याच्याशी बोलत नसल्याने शालीन खूप अस्वस्थ आहे. शालीन टीनाला विचारतो कि, तुझं माझ्यावर प्रेम आहे का? उत्तरात टीना म्हणते की, ‘हो, मला तुझ्याबद्दल भावना आहेत, त्यावर शालीन म्हणतो कि, ‘का तू हे सगळं फक्त कॅमेऱ्यासमोर दाखवण्यासाठी केलंस. त्यावर टीना म्हणते कि, ‘तू नेहमीच हे करतोस, ‘तू असं दाखवण्याचा प्रयत्न करतोयस कि मीच तुला फसवलं.’ हेही वाचा - Urfi Javed: जावेद अख्तर उर्फीचे आजोबा? त्यांच्या सोबत फोटो शेअर सांगितलं नातं यानंतर शालीन म्हणतो की, ‘याआधी तू तुझं माझ्यावर प्रेम आहे असे सांगितले होते आणि आता तू माघार घेतली आहेस.’ यावर टीना उत्तर देते,  ‘आपण एकमेकांना मूर्ख बनवत आहोत.’ यावर शालीन म्हणतो की, तीन आपण आपल्या मुलांबद्दल बोलत होतो.’ टीना मग हात जोडून म्हणते, ‘माझी इमेज आधीच खराब झाली आहे, तू माझ्यासोबत राहू नकोस.’ याच्यावरून कळतं कि या दोघांचं नातं एवढं पुढे गेलं होतं कि दोघांनी मुलांचा देखील विचार केला होता.

संबंधित बातम्या

प्रोमो पुढे दाखवते की घरातील सर्व स्पर्धक लिव्हिंग एरियामध्ये बसलेले आहेत आणि बिग बॉस त्यांना सांगतात की तुम्ही सर्वजण तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मिस करत असाल. दीर्घ प्रतीक्षेनंतर, कुटुंबातील सदस्य त्यांच्या प्रियजनांसोबत असतील. यानंतर स्पर्धकाचे कुटुंबीय स्क्रीनवर दिसतात. आता हा फॅमिली वीक बिग बॉसच्या सदस्यांसाठी  ठरतो ते येणाऱ्या भागात कळेल.

या आठवड्यात सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धकांच्या क्रमवारीत लोकांची मने जिंकणारा स्पर्धक म्हणजे एमसी स्टॅन. होय, ना शिव ना प्रियंका ना अब्दु. ज्या स्पर्धकाने प्रथम क्रमांक पटकावला तो एमसी स्टॅन आहे. स्टॅनला या आठवड्यात शोमध्ये दोन मोठे फायदे मिळाले आहेत. या यादीतील दुसऱ्या क्रमांकावर सर्वांचा प्रिय अब्दु रोजिक आहे. तर शिव ठाकरेंची लोकप्रियता थेट पाचव्या क्रमांकावर घसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या