'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात आहे शिवानी सुर्वे!

‘देवयानी’ या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे.

‘बिग बॉस मराठी २’मध्ये सहभागी झालेली शिवानी पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली होती.

 शिवानी तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

शिवानी सुर्वे सध्या एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या प्रेमात आहे.

अभिनेत्री शिवानी सुर्वे अजिंक्य ननावरे या अभिनेत्याला डेट करतेय.

हे दोघे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अजिंक्य ननावरे एक उत्तम अभिनेता आहे.

‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘सख्या रे’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये अजिंक्यने काम केले आहे.

‘पावनखिंड’ या चित्रपटात अजिंक्यने ‘नरवीर शिवा काशीद’ ही भूमिका साकारली आहे.

सध्या तो झी मराठीच्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत आदित्यच्या भूमिकेत दिसत आहे.