JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Abdu Rozik: बिग बॉसच्या अब्दू रोजिकचं पुणेकरांनी केलं असं स्वागत; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात!

Abdu Rozik: बिग बॉसच्या अब्दू रोजिकचं पुणेकरांनी केलं असं स्वागत; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात!

बिग बॉसच्या घरातील सगळयात लोकप्रिय स्पर्धक म्हणजे अब्दू रोजीक नुकताच पुण्यात आला आहे. त्याचं कसं स्वागत झालं एकदा पाहाच.

जाहिरात

अब्दु रोजिक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जानेवारी: ‘बिग बॉस 16’ हा शो लवकरच अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. शोमध्ये रोज नवनवे आणि मजेदार ट्विस्ट येत आहेत. नुकताच अब्दु रोजिक अचानक घराबाहेर पडला. घरातील सगळयात लोकप्रिय स्पर्धक म्हणजे अब्दू रोजिक. तो कायमच चर्चेत राहतो. बिग बॉसमुळे त्याचे चाहते घराघरात आहेत. मध्यंतरी अब्दुने घरात पुन्हा एंट्री घेतली होती. पण त्याच्या चाहत्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण  अब्दुला पुन्हा बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला. पण अब्दू या ना त्या कारणाने चर्चेत राहतोच. अब्दू सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. त्याचे प्रचंड प्रमाणात चाहते आहेत. आता बिग बॉसच्या बाहेर आल्यावर अब्दू भारतातील वेगवेगळ्या शहरात त्याचे कॉन्सर्ट घेणार आहे. याचसाठी नुकतंच तो पुण्यात आला आहे. त्याचे फोटो इंस्टाग्रामवर टीआरपी मराठी या पेजने  शेअर केले आहेत. पुण्यात येताच अब्दुला खास पुणेरी पगडी आणि शाल देऊन त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. छोट्याशा अब्दुवर ही पुणेरी पगडी फारच उठून दिसत आहे. अब्दुचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हेही वाचा - Madhurani Prabhulkar: अरुंधती आणि अनुष्काने सोबत मिळून केलं असं काही! दोघींच्या ‘त्या’ व्हिडिओची होतेय चर्चा बिग बॉसच्या घरात अब्दू आणि मराठमोळ्या शिव ठाकरेंचं खास नातं होतं. या दोघांमधील बॉण्डिंग वेळोवेळी पडद्यावर दिसलं होतं. अब्दुने घराचा निरोप घेताच शिव ठाकरे ढसाढसा रडला होता. आता अब्दुला खास मराठमोळ्या पगडीत पाहून शिवचे चाहते देखील आनंदी होतील.

संबंधित बातम्या

अब्दूने त्याच्या भविष्यातील योजनांबद्दलही मोठे खुलासे केले आहेत. यावेळी अब्दुला त्याचं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचं कारण विचारलं असता तो म्हणाला कि, ‘मला शो सोडावा लागला कारण माझ्यासाठी समोर खूप काम पडलं आहे आणि त्यामुळे मला त्यासाठी घराबाहेर पडावे लागले. आता बऱ्याच गोष्टी पुढ्यात आहेत आणि त्यासाठी मी उत्सुक आहे.

त्याला पुढील काही दिवसांच्या योजनांबद्दल विचारले असता  तो म्हणाला, ‘मी पुढील काही दिवस भारतात आहे. मी इथे एका गाण्याचे शूटिंग करणार आहे. त्यानंतर मी दुबईला काही कामासाठी जाईन आणि तिथून मला अमेरिकेला जाणार आहे.’ तसेच त्याला पुन्हा भारतात कधी येणार याविषयी विचारले असता  तो म्हणाला, ‘मी भारतात परत येण्याचा विचार करत आहे. लोकांनी मला खूप प्रेम दिले आहे आणि मला येथे खूप काम करायचे आहे. त्यामुळे मी लवकरच परत येईन.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या