अब्दू रोजिक
मुंबई, 18 डिसेंबर : ‘बिग बॉस’ चा प्रत्येक सीझन चांगलाच लोकप्रिय ठरतो. बिग बॉसचा 16 वा सीझन सुरु असून यंदाच्या सीझन चांगलाच वादग्रस्त ठरत आहे. जसा जसा बिग बॉसच्या शो पुढे सरकत आहे तस तसा सदस्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात खूप हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. घरातील सगळयात लोकप्रिय स्पर्धक म्हणजे अब्दू रोजीक. तो कायमच चर्चेत राहतो. बिग बॉसमुळे त्याचे चाहते घराघरात आहेत. पण आता या आठवड्यात अब्दुला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. आता त्यानंतर त्याने घराबाहेर पडण्याचं कारण सांगितलं आहे. ‘बिग बॉस 16’ मधील छोटे भाईजान म्हणजेच अब्दू रोजीकचा प्रवास संपला आहे. अब्दूने शोमधून एक्झिट घेतल्याची बातमी आल्यापासून चाहते निराश झाले होते. सोशल मीडियावर अब्दुल शोमध्ये वापस आणण्याची मागणी चाहते करत आहेत. याआधी अब्दूच्या तब्येतीची माहिती समोर येत होती, मात्र हा शो ऑन एअर झाल्यानंतर अब्दूच्या मॅनेजमेंट टीमशी बोलल्यानंतर त्याला एका व्हिडिओ गेमच्या संदर्भात शोमधून बाहेर काढण्यात आल्याचे समोर आले आहे. शोमधून बाहेर येताच अब्दूने लाइव्ह येऊन चाहत्यांशी संवाद साधत कारण सांगितलं आहे. हेही वाचा - Shahrukh Khan : चाहत्यानं विचारलं ‘का पाहायचा मी पठाण?’ शाहरुखच्या उत्तरानं जिंकलं मन अब्दू रोजिकला बिग बॉसने बाहेर काढलं नसून त्याच्या मॅनेजमेंट टीमनेच बिग बॉसला तशी विनंती केली होती. त्यानंतरच त्याला शोमधून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. अब्दू रोजिकवर एक व्हिडिओ गेम तयार करण्यात येणार आहे, ज्यासाठी त्याची गरज होती. आता अब्दु बाहेर पडताच त्याच्या गेमचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये अब्दू एका टेबलासमोर बर्गर ठेवून उभा आहे. त्यानंतर तो बॉक्सिंग रिंगमध्ये प्रवेश करतो, परंतु त्याचा चेहरा दाखवला जात नाही.
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर अब्दु रोजिकही लाइव्ह आला होता. त्यांनी काही वेळ चाहत्यांशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘बिग बॉस हा सर्वोत्तम शो आहे, मला बिग बॉस खूप आवडतो. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. मी खूप आनंदी आहे.’ यासोबतच अब्दूने सांगितले की तो शोमध्ये परतणार आहे, ज्यानंतर चाहतेही खूप खूश झाले आहेत.
अब्दू रोजिक हा शोच्या सर्वात लोकप्रिय आणि आवडत्या स्पर्धकांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत अब्दू शोमधून बाहेर पडल्याने केवळ प्रेक्षकच नाही तर कुटुंबातील सर्व सदस्य निराश झाले होते. एमसी स्टेन म्हणतो की शोने त्याचे आकर्षण गमावले आहे. त्याचवेळी ट्विटरवरही नो अब्दुल नो बिग बॉस ट्रेंड होऊ लागला. त्याचवेळी, आता प्रेक्षक अब्दू रोजिक लवकरच शोमध्ये परतण्याची वाट पाहत आहेत.