JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बिग बॉस विजेती Tejasswi Prakash चं चमकलं नशीब, एकता कपूरनं दिली मोठी ऑफर

बिग बॉस विजेती Tejasswi Prakash चं चमकलं नशीब, एकता कपूरनं दिली मोठी ऑफर

बिग बॉस 15 ची विजेती ठरलेल्या तेजस्वी प्रकाशला(tejasswi prakash ) एकता कपूरकडून मिळाली मोठी ऑफर. या शोमध्ये दिसणार मुख्य भुमिकेत.

जाहिरात

tejasswi prakash

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 जानेवारी: कता कपूरची (Ekta Kapoor) ‘नागिन’ (Naagin) ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका आहे. आता या मालिकेचा 6 वा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी, मालिकेचा प्रोमोदेखील प्रदर्शित झाला होता. मात्र, मालिकेत नागिन कोण साकारणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. दरम्यान याचा आता खुलासा झाला असून बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash ) नागिनची भूमिका साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या शोचा प्रोमो रिलीज करण्यात आला. त्यावेळी यामध्ये, ‘नागिन 6’ ची कथा विषाणूपासून संरक्षण करणे, अशी आहे. व्हायरसपासून देशाला वाचवण्याचे काम नागिन हाती घेणार आहे. आतापर्यंत नागिन तिच्या प्रेमासाठी आणि कुटुंबासाठी लढली आहे. पण या भागात नागिन देशासाठी लढताना दिसणार आहे. बिग बॉस सिझन 15 (Bigg Boss 15) चा काल ग्रँड फिनाले पार पडला. प्रतीक सेहजपाल (Pratik Sehajpal) , तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) हे अंतिम फेरीमधील टॉप 3 स्पर्धक होते. या स्पर्धेची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ठरली. बिग बॉस 15 ची विजेती ठरलेल्या तेजस्वीला या शोमध्ये असताना नागिन 6 या कार्यक्रमाची ऑफर मिळाली आहे. त्यामुळे एकता कपूरच्या या नव्या शोमध्ये आता नागिनची भूमिका तेजस्वी साकारणार आहे. बिग बॉससोबतच या कार्यक्रमांमुळे देखील तेजस्वी होती चर्चेत ‘खतरों के खिलाडी 10’ व्यतिरिक्त ती ‘किचन चॅम्पियन 5’, ‘कॉमिडी नाइट्स लाइव्ह’, ‘कॉमिडी नाइट्स विद कपिल’ आणि ‘कॉमिडी नाइट्स बचाओ’ यांसारख्या शोमध्ये देखील तेजस्वीनीनं सहभाग घेतला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या