मुंबई, 22 डिसेंबर : बिग बॉस 13मध्ये सध्या बरीच भांडणं आणि वाद पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ शुक्लाची घरवापसी झाली. त्याच्या घरात परतल्यानं काही सदस्य खूश होते तर काही मात्र त्याच्या येण्याचा फारसा आनंद झालेला दिसला नाही उलट त्यांच्या कपाळाला आठ्या पडलेल्या दिसल्या. या आठवड्यात घरातील सदस्य विशेषतः आसिम आणि रश्मि देसाई यांचं सिदार्थ शुक्लाशी मोठं भांडण झालेलं पाहायला मिळालं. शुक्रवारी झालेल्या एका टास्कमध्ये आसिम आणि सिद्धार्थमध्ये नाराजी पाहायला मिळाली. दरम्यान रश्मिनं आता तुझी तब्येत ठिक आहे तर आता तु टास्क करु शकतोस. रश्मिच्या या बोलण्यावर सिद्धार्थ भडकला आणि रश्मिकडे इशारा करत आसिमला विचारतो ती तुझी नोकरानी आहे का? त्यांचं हे भांडण एवढं वाढलं की विकेंड का वारमध्येही हे दोघं शांत होण्याच्या मूडमध्ये नाहीत. या दोघांचं रश्मि सिद्धार्तवर चहा फेकताना दिसत तर उत्तरादखल सिद्धार्थ सुद्धा तिच्यावर चहा फेकतो. त्यावेळी अरहान या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र यावेळी सिद्धार्थ त्याचं शर्ट फाडतो. ‘शोषणासाठी पॉवरफुल पदाचा वापर केला जात असेल तर…’ सनी लिओनीनं दिला मोलाचा सल्ला
या सगळ्या प्रकारानंतर रश्मि घारात जाते आणि अरहानला म्हणते त्याची हिम्मत कशी झाली मला अशी मुलगी म्हणण्याची. अशी मुलगी म्हणजे त्याला नक्की काय म्हणायचं आहे. यावेळी आरती तिची समजूत काढायला येते. तिला रश्मि म्हणते, तो म्हणाला की, त्यानं मला घरात घेणं बंद केलं आहे. याचा अर्थ काय आहे. एकाही मुलीनं मला समर्थन दिलं नाही. घरातल्या सर्व मुली भित्र्या आहेत. मागचे अडीच महिने मी त्याच ऐकून घेत आहे. मी अशा माणसांसोबत मला या घरात राहायचं नाही. अभिनेत्री मौनी रॉयच्या सुंदर चेहऱ्याचं ‘हे’ आहे रहस्य! विकेंड का वारमध्ये रश्मि सिद्धार्थवर ड्रग्स घेत असल्याचा आरोप केला आहे. रश्मिचा हा खुलासा ऐकल्यावर सलमान सुद्धा हैराण होतो. घरातल्यांचं हे भांडण सलमान खान स्क्रीनवर बघत आहे. आज प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये सलमान या सर्वांना कसं सुनावतो आणि कोणाला काय शिक्षा देतो हे पाहायला मिळाणार आहे. VIDEO : माधुरीच्या ‘एक-दो-तीन…‘वर सारा अली खान जोशात थिरकते तेव्हा…