JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss : बिग बॉसमुळं जुळलं होतं नातं; आता 5 वर्षांच्या रिलेशनशिप नंतर या प्रसिद्ध जोडीचं ब्रेकअप

Bigg Boss : बिग बॉसमुळं जुळलं होतं नातं; आता 5 वर्षांच्या रिलेशनशिप नंतर या प्रसिद्ध जोडीचं ब्रेकअप

बिग बॉसमध्ये नातं जुळलेल्या अशाच एका जोडीच्या ब्रेकअपची माहिती समोर आली आहे. ‘बिग बॉस’च्या 11व्या सीझनमध्ये झळकलेल्या या जोडप्याचं नातं आता तब्बल पाच वर्षांनंतर संपुष्टात आलं आहे.

जाहिरात

बंदगी कालरा आणि पुनेश शर्मा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23  जुलै : वादग्रस्त पण लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये फक्त भांडणंच होत नाहीत तर अनेकांना एकमेकांवर प्रेम देखील होतं. या शोमध्ये आतापर्यंत 16 सीझन झाले असून या घरातून अनेक कपल्स बाहेर पडले आहेत. यातील काहींचं नातं शेवट्पर्यंत टिकून त्यांनी लग्न केलं तर काहींचं नातं लगेच तुटलं. आता बिग बॉसमध्ये नातं जुळलेल्या अशाच एका जोडीच्या ब्रेकअपची माहिती समोर आली आहे.  ‘बिग बॉस’च्या 11व्या सीझनमध्ये झळकलेल्या या जोडप्याचं नातं  आता तब्बल पाच वर्षांनंतर संपुष्टात आलं आहे. ‘बिग बॉस’च्या 11व्या सीझनमध्ये बंदगी कालरा आणि पुनेश शर्मा यांची भेट झाली होती. दोघेही प्रेमात पडले. दोघांची जवळीक वाढली आणि दोघेही ५ वर्षे एकत्र राहिले. पण आता दोघांनी आपलं नातं संपवल्याची बातमी समोर येत आहे. दोघांचंही ब्रेकअप झालं आहे.  बंदगी कालराने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून ही वाईट बातमी दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, ती आणि पुनेश वेगळे झाल्याची माहिती दिली आहे. दोघांनी परस्पर संमतीने हे नाते संपवले असल्याचे सांगितले. यासोबतच त्यांनी एकमेकांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंतीही केली आहे.

बंदगी कालराने लिहिलंय की, ‘नमस्कार, मी आणि पुनेशने परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचे मार्ग वेगळे आहेत. एकत्र घालवलेले क्षण आम्ही नेहमी लक्षात ठेवू. आपण जीवनात काहीही केले तरी आपण नेहमी एकमेकांवर प्रेम आणि समर्थन करू. आमच्या गोपनीयतेचा आदर करा आणि अफवा पसरवू नका.’ दीड वर्षात 3 चित्रपट फ्लॉप, ‘या’ सुपरस्टारमुळं निर्मात्यांचं 410 कोटींचं नुकसान; आता एका सिनेमावर टिकलंय भविष्य ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यापासून बंदगी आणि पुनेश यांच्यात वाद सुरू आहेत. ती शोमध्ये असताना, एका कास्टिंग डायरेक्टरने दावा केला की ती आधीपासूनच त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याने फसवणूक केल्याचा आरोप केला. मात्र, बंदगीने हे दावे फेटाळून लावले. दोघांनीही शोदरम्यान एकमेकांना डेट केलेच नाही, तर शोमध्ये इंटिमेट झाल्यामुळेही अनेकदा चर्चेत आले होते. त्यांनी नॅशनल टीव्हीवर त्यांच्या नात्याची कबुली दिली आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याची अफवा  पसरली होती.

दरम्यान, बंदगीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती एक इंजिनिअर आहे. बिग बॉस या शोसाठी तिने नोकरी सोडली होती. बंदगीला मॉडेल म्हणून ओळखले जाते. पण सध्या ती कंटेंट क्रिएटर व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर म्हणून जास्त लोकप्रिय आहे. तर पुनीत हा एक अभिनेता आहे. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर बंदगी कालरा आणि पुनेशच नाही तर अनेक जोडपी वेगळे झाले आहेत. यामध्ये गौहर खान-कुशाल टंडन, अरमान कोहली-तनिषा मुखर्जी, पारस छाबरा-माहिरा शर्मा, राकेश बापट-शमिता शेट्टी यांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या