मुंबई, 29 डिसेंबर- मराठी बिग बॉस तीनचा**(Bigg Boss Marathi 3)** विजेता विशाल निकम ठरला आहे. तर जय दुधाणे**(Jay Dudhane )** हा उपविजेता झाला आहे. या शंभर दिवसाच्या प्रवासाबद्दल जय दुधाणेने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. यावेळी त्याला काही मजेदार प्रश्न विचारण्यात आले. त्याची उत्तरे त्याने दिलखुलासपणे दिली आहेत. यावेळी त्यांनी स्नेहा वाघला बबली तर मीरा जगन्नाथला स्वीटहार्ट तर आविष्कारला कलिंकड व आदिश वैद्यला त्यांने टॉमी असं म्हटलं आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीतमध्ये जय दुधाणे याला काही प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे बिग बॉस घऱातील सदस्यांचे एका शब्दात वर्णन करायाला त्याला सांगितले. त्यावेळी त्याने विकास पाटील याला झोपाळू व विशाल निकमला रांगडा गडी म्हटले. मीराला त्याने स्वीटहार्ट म्हटले तर स्नेहाला बबली म्हटले. यासोबतच तर आविष्कार कलिंगड व तृप्ती देसाई यांना एक नारी सभपे भारी..अशी उपमा दिली आहे. तर महेश मांजरेकरांना त्याने आई- बाप म्हटलं. वाचा- Bigg Boss Marathi 3: विशाल निकम जिंकलेल्या रक्कमेचे करणार ‘हे’ काम महेश मांजरेकर यांनी जय दुधाणे याला त्यांच्या आगामी सिनेमा शनिवारवाडा याची ऑफर दिली आहे. त्यामुळे जयने हा शो जिंकला नसला तरी त्याने महेश मांजरेकर यांचे मन नक्कीच जिंकले आहे. तसेच या सिनेमातून तो प्रेक्षकांचे मन जिंकण्यात देखील नक्कीच यशस्वी होईल. वाचा- देवोलिनाने बिचुकलेला हासडली अशी काही शिवी..; मग जे झालं ते पाहाचं जय दुधाणे मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनचा रनरअप ठरला आहे. मी विजयाची ट्रॉफी जिंकावी असं मला मनापासून वाटत होतं असं तो म्हणाला. मी स्प्लिट्सव्हीलाचा हिंदी रियालिटी शो गाजवला होता परंतु मला आपण ज्या राज्यात रहातो त्या मराठी सृष्टीशी मला जोडायचं होतं. म्हणून मी मराठी बिग बॉसच्या शोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मला बिग बॉसच्या शोमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे. माझ्या घऱी व सोसायटीत देखील माझे जंगी स्वागत करण्यात आल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच त्याने सध्या बिग बॉसच्या घऱाला मिस करत असल्याचे देखील सांगितले.
जय दुधाणे कोण आहे ? जय दुधाणे याने बिग बॉस मराठी शो करण्यापूर्वी हिंदी रिअॅलिटी स्प्लिट्सविला हा शो देखील केला आहे. या कार्यक्रमातून त्याला प्रसिद्धी मिळाली. जय एक उद्योगपती आहे व त्याला महागड्या चारचाकी गाडींचा शोक आहे. यासोबतच त्याला फिटनेसची देखील आवड आहे.