JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / माधुरीने शेअर केला सिद्धार्थसोबतचा शेवटचा Video; म्हणाली..

माधुरीने शेअर केला सिद्धार्थसोबतचा शेवटचा Video; म्हणाली..

माधुरी दीक्षितने तिचा डेली रुटीनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाही दिसत आहे. सिद्धार्थ आणि माधुरीचा एकत्र काम करतानाचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शूट केल्यानंतर काही दिवसांतच सिद्धार्थचे निधन झाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 ऑक्टोबर :  बॉलीवू़डची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सोशल मीडियीवर नेहमी अॅक्टीव असते. माधुरीने (Madhuri Dixit Video) तिच्या चाहत्यांसाठी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. माधुरीच्या या व्हिडिओत दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) देखील दिसत आहे. ‘अ डे इन द लाईफ ऑफ माधुरी दीक्षित’ अशा कॅप्शनचा व्हिडिओ यूट्यूब (YouTube) वर शेअर केला आहे. यामध्ये माधुरीने तिचं डेली रूटीन सांगताना दिसत आहे. सकाळी उठण्याापसून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे दिवसभरात ती काय करते, काय खाते या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सगळ्या व्हिडिओत सिद्धार्थ शुक्ला एक झलक पाहून चाहते कीहीसे भावुक देखील झाले आहेत. माधुरीच्या या व्हिडिओत पाहू शकता की, सकाळच्या चहापासून ते मेकअप असेल किंवा हेअर स्टाइलिंग सेशन किंवा साध नेलपेंट लावयचं असेल या आणि अशा लहान लहान गोष्टी माधुरी कशी तयार होते हे यामध्ये पाहायला मिळत आहे. शुटिंगच्यावळी मधल्या वेळेत माधुरी काय करते तसेच ती तिचा आहार कसा घेते. माधुरीच्या दिवसाची सुरूवात चहा आणि ब्राऊन टोस्ट आणि अंड्याच्या भुर्जीपासुन होते. या भुर्जीमध्ये कांदा टोमॅटो याचा वापर नसतो. साधा आणि हलकाफुलका नाष्टा माधुरी करताना दिसते. तसेच दिवसाची सुरूवात तिला चहाने करायला आवडत असल्याचे देखील ती सांगताना दिसत आहे. वाचा :  शिल्पा-राजविरोधातील आरोप शर्लिनला महागात; कोर्टात 50 कोटींचा मानहानीचा खटला यासोबत कशाप्रकारे तयार झाल्यानंतल माधुरी साडी नेसल्यानंतर फोटोशूट करते याची झलक देखील माधुरीने या व्हिडिओत दाखवली आहे. साडी नेसल्यानंतर माधुरी ‘डांन्स दीवाने 3’ च्या सेटवर जाते. यावेळी ती दुपराचं जेवण कसं असतं हे सांगताना दिसत आहे. दुपारी माधुरी पनीर, पनीर मखनी, फ्लावर घातलेला भात आणि काही उकडलेल्या भाज्या खाताना दिसत आहे.

माधुरीच्या या व्हिडिओत बिगबॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाही दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराने सिद्धार्थचे अकाली निधन झाले. त्याने मृत्यूच्या काही दिवस आधीच ‘डान्स दिवाने ३ ‘चा एक विशेष भाग शूट केला होता. ‘ब्रोकन बट ब्यूटीफूल ३’ या वेब शोच्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ ‘डान्स दिवाने ३’ च्या सेटवर आला होता. तेव्हा माधुरी आणि सिद्धार्थ ‘दिल तो पागल है’ मधील एका प्रसिद्ध सीनवर एक्टिंग करताना दिसले होते. वाचा :  आली लग्नघटिका समीप! सुयश टिळक-आयुषी भावेला लागली हळद; पाहा क्युट कपलचे Photo सिद्धार्थच्या निधनानंतर माधुरीने एक ट्वीट करत दु:ख व्यक्त केले होते. “याच्यावर विश्वास बसत नाही आणि हे धक्कादायक आहे. आपण नेहमीच स्मरणात राहाल सिद्धार्थ शुक्ला. आपल्या आत्म्यास शांती लाभो. कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करते,” असं ट्वीट माधुरीने केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या