मुंबई, 16 जुलै- राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या(National Aword Winning) ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री (Surekha Sikri) यांचं नुकताच निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. कार्डिअॅक अरेस्ट अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं आहे. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’ (Balika Vadhu) मध्ये त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी ‘बधाई हो’ या चित्रपटातदेखील लक्षवेधी भूमिका साकारली होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मेनेजरने त्यांच्या निधननाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांच्या मेनेजरने सांगितलं की, त्यांनी आज सकाळी शेवटचा श्वास घेतला आहे. दुसऱ्या ब्रेन स्ट्रोक नंतर त्या खूपच चिंतीत होत्या. त्यांना सर्वप्रथम सन 2018 मध्ये पहिला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना लकवा आला होता. त्यांची तब्येत खूपच चिंतीत होती. त्यांनतर त्या ठीक तर झाल्या मात्र जास्त काम नाही करू शकल्या. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर 2020 मध्ये त्यांना दुसरा ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यामुळे त्यांची अवस्था खुपचं गंभीर झाली होती. (हे वाचा: धक्कादायक! T-Seriesच्या भुषण कुमारावर 30 वर्षीय तरुणीच्या बलात्काराचा गंभीर आरोप ) सुरेखा सिक्री या एक थियेटर अभिनेत्रीही होत्या. तसेच त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये ठळक भूमिका साकारल्या आहेत. त्यांना तब्बल 3 वेळा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये तमस(1988), मम्मो(1995) आणि बधाई हो(2018) या चित्रपटांचा समावेश आहे. 66 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना चित्रपट ‘बधाई हो’ मधील आज्जीच्या उत्तम भूमिकेसाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.