मुंबई, 27 मार्च : सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं अक्षरशः दहशत माजवली आहे. भारतालाही या व्हायरसनं विखळा घालायला सुरुवात केली असून सध्या देशात या विषाणूचे 600 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. अशात सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या सिनेमांचं शूटिंग थांबवून घरी थांबले आहे. देशातही सध्या लॉकडाउन करण्यात आलं आहे. मात्र सध्या सर्वच सेलिब्रेटी कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत करताना दिसत आहेत. यासर्वात साउथ अभिनेता प्रभासचं नाव सर्वात पहिलं घेतलं जात आहे. ‘बाहुबली’ सिनेमातून प्रेक्षकांमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा प्रभास सध्या स्वतः सुद्धा होम क्वारंटाईनमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभास त्याच्या सिनेमाचं शूटिंग संपवून परदेशातून भारतात परतला आहे त्यामुळे त्यानं स्वतःला घरात बंद करुन घेतलं आहे. मात्र असं असतानाही सामाजिक भान ठेवत त्यानं कोरोनाग्रस्तांसाठी 3 कोटी पंतप्रधान मदत निधी आणि प्रत्येकी आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री मदत निधीसाठी दान केले आहेत. यानुसार प्रभासनं कोरोनाग्रस्तांसाठी एकूण 4 कोटी रुपये दान केले आहेत. अमिर खानच्या लेकीचं गुपित झालं उघड म्हणाली, ‘या’ अभिनेत्रीला करायचंय डेट
प्रभास काही दिवसांपूर्वीच जॉर्जियामधून भारतात परतला आहे. या ठिकाणी त्याचा आगामी सिनेमा ‘प्रभास 20’चं शूटिंग सुरू होतं. या सिनेमात त्याच्यासोबत पूजा हेगडे सुद्धा दिसणार आहे. जॉर्जियातून परतल्यावर या दोघांनीही खबरदारी म्हणून स्वतःला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केलं आहे. बादशाहचा नवीन म्युझिक VIDEO ‘गेंदा फूल’ लाँच, जॅकलिन दिसली हॉट बंगाली लुकमध्ये
प्रभासच्या अगोदर साउथ अभिनेता पवन कल्याणनं 2 कोटी, त्याचा भाचा आणि अभिनेता रामचरणनं 70 लाख रामचरणचे वडील आणि तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांनी 1 कोटी आणि युवा सुपरस्टार महेश बाबू यानं 1 कोटी रुपये मदत निधीमध्ये दान केले आहेत. लॉकडाउन झाल्यानंतर परेश रावल यांनी शोधला Social Distancing चा अर्थ