मुंबई 12 जुलै: सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ (ekda kay zala) हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सुमित राघवन, उर्मिला कोठारे आणि छोटा अर्जुन पूर्णपात्रे अशी बरीच मोठी स्टारकास्ट आहे. लहानपणी सगळ्यांनीच अनेकदा आजी आजोबांकडून किंवा घरातल्या वडीलधाऱ्यांकडून ऐकल्या असतील तशीच गोष्ट सांगणाऱ्याची एक गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा टिझर आज प्रदर्शित झाला असून त्यावर खूप चांगला प्रतिसाद येताना दिसत आहे. याचसोबत सध्या चर्चा होत आहे ती आणखी एका मराठी चित्रपटाची तो म्हणजे (de dhakka 2) दे धक्का 2. येत्या ऑगस्ट महिन्यात दोन सिनेमांची टक्कर (august marathi movie clash) पाहायला मिळणार आहे. एकदा काय झालं हा सिनेमा आणि महेश मांजरेकरांचा दे धक्का 2 हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट 2022 ला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करणारे दोन सिनेमे चित्रपटगृहात भेटीला येणार असल्याने सध्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. ‘गोष्टीला आणि गोष्टी ऐकणाऱ्याला वय नसतं’ असं सांगणारा टिझर सध्या ‘एकदा काय झालं’ सिनेमाची उत्सुकता वाढवताना दिसत आहे. टीझरमध्ये वडील मुलाचं दिसणारं नातं सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांसह मुख्यतः या सिनेमात वडील आणि मुलाचं घट्ट होत जाणारं नातं सुद्धा पाहायला मिळणार आहे.तसंच या टीझरच्या शेवटी एका स्पेशल पाहुणी सुद्धा पाहायला मिळत आहे. ती आहे मुक्ता बर्वे. मुक्ताचा या सिनेमात गेस्ट अपिअरन्स आहे. तिचं काम बघायला सुद्धा प्रेक्षक आतुर झाले आहेत. हे ही वाचा- Subodh Bhave wedding anniversary: सुबोध मंजिरीची लाँग डिस्टन्स लव्हस्टोरी, सोशल मीडिया नसताना असं व्हायचं बोलणं “दे धक्का 2 च्या बाबतीत सांगायचं झालं तर या सिनेमाची तारीख रिव्हील करणारा एक टिझर प्रदर्शित झाला होता आणि नुकतच सिनेमाचं नवं पोस्टरसुद्धा रिलीज करण्यात आलं. दे धक्का या सिनेमाच्या यशानंतर मकरंद जाधव आणि त्याच्या अतरंगी कुटुंबाला भेटायला प्रेक्षक आतुर झाले आहेत. या सिनेमाची कथा लंडनमध्ये घडली असल्याचं पोस्टरवरून कळून येत आहे.
या दोन सिनेमांच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबाला एन्जॉय करता येईल अशा कलाकृती भेटीला येणार आहेत. दे धक्का सिनेअने बराच चाहतावर्ग मिळवला असल्याने दुसऱ्या भागातली गंमत बघायला आतुरता दिसून येत आहे.