अभिनेत्री असिनच्या घटस्फोटाच्या चर्चा
मुंबई, 28 जून : आमिर खानचा गजनी हा सिनेमा सर्वांनी पाहिला आहे. गजनीमध्ये कल्पना हे पात्र साकारणारी अभिनेत्री असिन थोट्टूमकल सर्वांच्या परिचयाची झाली. असिन ही मुळची साऊथ अभिनेत्री असली तरी हिंदी सिनेमातही आपलं नाव कमावलं. असिननं मायक्रोमॅक्सचा फाउंडर राहुल शर्माबरोबर लग्न केलं. लग्नानंतर असिननं बॉलिवूडला रामराम ठोकला. ती सोशल मीडियावर सक्रीय असते. नवऱ्याबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. पण अचानक तिनं सोशल मीडियावरून तिचे नवऱ्याबरोबर असलेले सगळे फोटो डिलीट केलेत. तिच्या या कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं असून असिन नवऱ्यापासून घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. असिन आणि राहुल शर्मा काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. 19 जानेवारी 2016साली त्यांनी लग्न केलं. दिल्लीमध्ये त्यांच्या लग्नाची मोठी तयारी करण्यात आली होती. ईसाई आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीनं दोघांनी लग्न केलं. 2017मध्ये असिन आणि राहुल यांना अरिन ही मुलगी झाली. हेही वाचा - 20 व्या वर्षीच जिंकला मिस इंडियाचा खिताब; पण नशिबानं साथ दिली नाही अन् अशी गायब झाली अभिनेत्री असिन आणि राहुल यांचे वैयक्तिक सगळे फोटो तिने सोशल मीडियावरून हटवलेत. तिच्या वॉलवर सध्या तिच्या 5 वर्षांच्या मुलीच्या बर्थडेचे फोटो पाहायला मिळत आहेत. तसंच अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर तिनं लिहिलेली इमोशन पोस्ट तिनं डिलिट केलेली नाही. त्यात असिन, राहुल आणि ऋषी कपूर अशा तिघांचा फोटो आहे. दोघांच्या लग्नातील हा फोटो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 2012मध्ये असिन हाउसफुल 2 सिनेमाच्या दरम्यान एका प्रायव्हेट जेटने ढाका येथे जात होती. तेव्हा तिच्याबरोबर अभिनेता अक्षय कुमार होता. अक्षय कुमार आणि राहुल शर्मा हे एकमेकांचे फार जवळचे मित्र आहेत. अक्षयनेच असिन आणि राहुल यांची ओळख करून दिली होती आणि त्यांना डेट करण्याचा सल्लाही दिला होता. असिनने मात्र अक्षयचं म्हणणं नजर अंदाज केलं होतं. कारण त्यावेळी असिनला माहिती नव्हतं की ती ज्या जेटने प्रवास करतय त्याचा मालक राहुल शर्मा आहे. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. असिनच्या एका फॅन पेजवर दोघांच्या घटस्फोटाची पोस्ट करण्यात आली आहे. त्यांनी म्हटलं आहे की राहुलने देखील फेब्रुवारी महिन्यात दोघांचे काही फोटो डिलीट केले होते. त्यानंतर काही फोटो अपलोड देखील केले. पण आता दोघांच्या प्रोफाइल दोघांचा एकत्र एकही फोटो दिसत नाहीये. राहुल आणि असिनच्या घटस्फोटाची अधिकृत माहिती नसली तरी दोघांच्या सोशल स्टेटसवरून चाहत्यांकडून हा अंदाज लावला जातोय.