मुंबई, 19 जुलै: गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आणि वयाच्या पंचाहत्तरीतही प्रेक्षकांना खळखळवून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. अशोक मामांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आणि योगायोग असा की याच वर्षी त्यांची सिनेसृष्टीतील 50 वर्ष पूर्ण झाली. याच निमित्तानं अशोक मामांचं ‘मी बहुरुपी’ हे पुस्कतही प्रकाशित करण्यात आलं. अशोक मामांचा 50 वर्षांचा प्रवास या पुस्तकातून तमामा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. आजवर बहुरुपी अशोक मामा आपल्याला माहिती आहेत. मात्र तेच अशोक मामा ‘बहुगुणी’ देखील आहेत. याचा प्रत्येय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात अशोक मामा तबला वादन करताना दिसत आहेत. अशोक मामांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर अशोक मामांचा तबला वादन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अशी बनवा बनवी असो, कॅप्टन बाजीराव रनगाडे असोत प्रत्येक सिनेमात अशोक मामांना आपण जबरदस्त अभिनय करताना पाहिलं आहे. परंतू अभिनयाबरोबरच अशोक मामा तबला वादनातही पारंगत आहेत. अशोक मामांचं बहुरुपी हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. हे पुस्तक बाजारात आल्यानंतर पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पुस्तकावरुन अशोक मामांच्या अनेक मुलाखती देखील घेतल्या जात आहेत. नुकतीच एक मुलाखत पार पडली या मुलाखती दरम्यान अशोक मामांनी तबल्यावर चांगलाच ठेका धरत कमाल तबला वादन केलं.
अशोक मामांना तबला वादन करताना पाहून सर्वांनाच मोठा सुखद धक्का बसला आहे. कारण आजवर अशोक मामांना आपण त्यांच्या अभिनयातून सर्वांना खळखळून हसवताना पाहिलं आहे. अशोक मामांना तबला वादनात अभिनेता विघ्नेश जोशी यानं साथ दिली आहे. निवेदिता यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता विघ्नेश जोशी पेटी वाजवताना दिसतोय तर अशोक मामांनी तबल्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळतयं. हेही वाचा - Prajakta Mali:एका नायिकेनं केलं दुसऱ्या नायिकेचं कौतुक, ‘अनन्या’ पाहिल्यानंतर प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत अशोक मामांच अफलातून तबला वादन पाहून त्यांच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अभिनेत्री सुकन्या मोनेनं ‘आईशप्पथ’ म्हणत मामांचं कौतुक केलंय. ‘बहुगुणी कलाकार’, ‘मामा इज द ग्रेट’, ‘क्या बात है’, ‘बहुरुपी नंतर बहुगुणी अशोक मामा’, अशा कमेंट करत चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. अशोक मामांना तबला वाजवताना पाहून सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.