JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 18 वर्षीय या अभिनेत्रीने खरेदी केली इतकी महागडी कार; त्या किमतीत कारचं शोरूम बनू शकतं

18 वर्षीय या अभिनेत्रीने खरेदी केली इतकी महागडी कार; त्या किमतीत कारचं शोरूम बनू शकतं

तिला खूप दिवसांपासून तिचे हे स्वप्न पूर्ण करायचे होते. तिच्या BMW X3 कारच्या फोटोंवरून ही कार किती लक्झरी आहे हे स्पष्टपणे दिसून येतंय. एका फोटोमध्ये कारचा ड्युअल पॅनोरमिक सनरूफ दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 मे : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अश्नूर कौर (Ashnoor Kaur) बुधवारी, 3 मे रोजी 18 वर्षांची झाली. आपला वाढदिवस संस्मरणीय बनवण्यासाठी तिनं स्वतःलाच BMW X3 कार भेट दिली. या आलिशान कारचे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिला खूप दिवसांपासून तिचे हे स्वप्न पूर्ण करायचे होते. तिच्या BMW X3 कारच्या फोटोंवरून ही कार किती लक्झरी आहे हे स्पष्टपणे दिसून येतंय. एका फोटोमध्ये कारचा ड्युअल पॅनोरमिक सनरूफ दिसत आहे. आता भारतात या कारची सुरुवातीची किंमत 40 लाख रुपयांपेक्षा कमी झाली आहे. अश्नूर ही ‘पटियाला बेब्स’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकांमधून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. 6 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग BMW X3 मध्ये 2.0-L चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 1,450 - 4,800 rpm आणि जास्तीत जास्त 350 Nm टॉर्क निर्माण करते. त्याच्या मदतीने ही कार फक्त 6.6 सेकंदात 0-100 किमी / ताशी वेग वाढवू शकते. त्याचा टॉप स्पीड 235 किमी/तास आहे. इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. या प्रीमियम एसयूव्हीमध्ये 19-इंच अलॉय व्हील उपलब्ध आहेत. तसे पाहायला गेल्यास Renault Kwid, Maruti S-Presso सारख्या कारचे संपूर्ण शोरूम या कारच्या किंमतीत उघडू शकते. हे वाचा -  ‘एका आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा’, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 6 एअरबॅग आणि 360 डिग्री कॅमेरा -

संबंधित बातम्या

BMW X3 ला स्टिअरिंग व्हील पॅडल शिफ्टर्ससह ऑटोमॅटिक डिफरेंशियल ब्रेक (ADB), ब्रेकिंग फंक्शनसह क्रूझ कंट्रोल आणि मानक म्हणून इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक मिळतात. हे BMW परफॉर्मन्स कंट्रोल सिस्टमद्वारे सुसज्ज आहेत. सुरक्षिततेसाठी, कारमध्ये 6 एअरबॅग्ज, अटेंशन असिस्टन्स, डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल (DSC) आहेत. यासोबतच यात कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल (CBC), ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, साइड-इम्पॅक्ट प्रोटेक्शन, इलेक्ट्रॉनिक व्हेईकल इमोबिलायझर, क्रॅश सेन्सर, 360 डिग्री कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग देखील मिळते. कारमध्ये ड्युअल पॅनोरामिक सनरूफ देखील आहे. हे वाचा -  गोहत्येच्या संशयावरून जमावाने केली 2 आदिवासींची हत्या; काय आहे संपूर्ण प्रकरण? कंपनी सर्व्हिस पॅकेजही देत ​​आहे BMW X3 SUV सोबत, कंपनी ‘BMW सर्विस इनक्लुसिव्ह’ आणि ‘BMW सर्विस इनक्लुसिव्ह प्लस’ सारख्या पर्यायी कंपनी सेवा देखील देत आहे. या सेवा पॅकेजमध्ये 3 वर्षे/40,000 किमी ते 10 वर्षे/2,00,000 किमीपर्यंतच्या प्लॅनसह कंडिशन बेस्ड सर्व्हिस (CBS) आणि देखभालीचे काम यांचा समावेश आहे. या सेवांची किंमत प्रति किमी 1.53 पासून सुरू होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या