asha bhosle honoured in lata dinanath mangeshkar award
मुंबई, 18 एप्रिल : भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी जगाचा निरोप घेतला. लता दीदींच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा निर्माण झाली. दरम्यान त्यांच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबियांनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा केली. 2022पासून हा पुरस्कार देण्यास सुरूवात झाली. आपल्या देशासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय काम करणाऱ्या, देशासाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागील वर्षी पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर यंदा ज्येष्ठ गायिका आणि लता दीदींच्या धाटक्या बहिण आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या यंदा 81व्या स्मृर्तिदिन आहे. याच दिवशी म्हणजे 24 एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचंही वितरण केलं जाणार आहे. मुंबईतील सायन येथील श्री ष्णमुखानंद हॉल येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. गेल्या 33 वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृर्ती प्रतिष्ठान, पुणे ही सार्वजनिक चॅरिटेबल स्ट्रस्ट चालवत आहेत. याच प्रतिष्ठानातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. हेही वाचा - नागराज आण्णांच्या डुप्लिकेटचा सैराट अंदाज पाहिलात का? मंजुळेही करू शकणार नाही स्वत:ची अशी ॲक्टिंग मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक याला सिनेमा आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला देखील हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार देण्यात येणार. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन गौरी थिएटर्सचं हे नाटक आहे. पाहा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची संपूर्ण यादी.