मुंबई, 28 मे- बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा**(Shah Rukh Khan)** मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं (NCB) नुकतीच क्लीनचिट दिली आहे. आता यानंतर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती ( rhea chakraborty ) आणि शोविक चक्रवती ड्रग केसची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. आर्य़न खान प्रकरणाची देखील अशापद्धतीनं फेरतपासणी करण्याची मागणी केली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला ड्रग केसमध्ये अटक झाली होती. रिया आणि शोविक जवळ ड्रग नव्हते सापडले होते आणि त्यांची टेस्ट देखील झाली नसल्याचा आरोप मानशिंदे यांनी केला आहे. सतीस मानशिंदे म्हणाले की, मला राजकीय अॅंगलवर कोणतेच भाष्य करायचे नाही शिवाय मला राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्यावर देखील कोणतेच भाष्य करायचे नाही. मी एक वकील आहे. गेल्या तीन वर्षात एनसीबीनं अनेक लोकांवर कारवाई करत त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं. त्यामुळं या कारवाया करण्याऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे. त्यांनी असं का केलं याबद्दल माहिती नाही. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे, अशी मी विनंत करतो. या प्रकरणात बारकाईन लक्ष घालण्याची गरज असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. वाचा- PM मोदींवर टीका करणं दीपाली सय्यद यांना पडलं महागात, अभिनेत्रीवर तक्रार दाखल अॅड. सतीश मानेशिंदे हे रिया चक्रवर्तीचे वकील आहेत त्याचबरोबर त्यांनी आर्यन खानची केसही लढली होती. एनसीबीनं आर्यन खानविरोधात ड्रग्ज घेतल्याचे कुठलेही पुरावे नाहीत म्हणून त्याचं नाव आरोपपत्रातून वगळलं आहे. यानंतर आता रिया चक्रवर्ती आणि शोविक प्रकरणाची देखील फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे.