ही इज बॅक! पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार डॅडींचा दबदबा, दगडी चाळ 2 'या' दिवशी होणार रिलीज
मुंबई, 20 जून: ‘चुकीला माफी नाही’ असं म्हणणाऱ्या अरुण गवळींचा ( Arun Gawli) म्हणजे डॅडींचा ( Daddy) दबदबा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दगडी चाळ च्या यशानंतर ‘दगडी चाळ2’ ( Daagdi Chaawl 2) प्रेक्षकांच्या भेटीला असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली आहे ( Daagdi Chaawl 2 Release Date) येत्या18 ऑगस्टला दगडी चाळ 2 प्रदर्शित होणार आहे. दगडी चाळच्या तूफान प्रतिसादानंतर सिनेमाचा सिक्वेल यावा अशी प्रेक्षकांची इच्छा होती. प्रेक्षकांनी ही इच्छा आता पूर्ण होणार असून ‘दगडी चाळ 2’ प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतीच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली. अभिनेते मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) तसेच अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) यांनी सिनेमाचं टीझर शेअर केला आहे. ‘दगडी चाळ2’ ची घोषणा करताच प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. पहिल्या भागा अरुळ गवळींच्या भूमिकेत अभिनेते मकरंद देशपांडे यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तर अंकुश चौधरी, संजय खापरे, पुजा सावंत यांचाही अभिनय पाहायला मिळाला. अंकुश आणि पुजाच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष प्रेम दिलं. आता ‘दगडी चाळ २’ मध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अभिनेते मकरंद देशपांडे आणि अंकुश चौधरी यांनी खास पोस्ट शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आणि टीझर शेअर केला आहे. ‘डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी, या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव, बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र तो मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
हेही वाचा - Kavita Medhekar: कविता लाड यांना नाटकाच्या शेवटच्या एंट्री आधी का आलं रडू? 47 सेकंदाच्या छोट्याशा टीझरमध्ये, तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री दाखवण्यात आलीय. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. त्याचप्रमाणे सिनेमात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक उत्साही आहेत. दगडी चाळ 2 या सिनेमाची निर्मिती संगीता अहिर यांनी केली. तर चंद्रकांत कणसे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. चित्रपटाच्या घोषणेबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ‘‘आज आम्हाला ‘दगडी चाळ २’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना विशेष आनंद होत आहे. ‘दगडी चाळ’ला प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही या सिनेमाचा सिक्वेल करण्याचा विचार केला. प्रेक्षकांसोबतच मलाही या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड रिलीज करण्याचा आमचा मानस आहे.’’