अर्जुन कपूरच्या बहिणीने दिली प्रेमाची कबुली.
मुंबई, 28 मार्च- बॉलिवूडचे असे काही स्टारकिड्स आहेत ज्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झालेली नसूनदेखील ते अतिशय लोकप्रिय आहेत.यामध्ये काजोल-अजयची लेक न्यास देवगनपासून ते बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूर ची बहीण अंशुला कपूर चादेखील समावेश आहे. अंशुला चित्रपटांमध्ये नसली तरी ती सतत चर्चेत असते. अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर ही एक सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आहे. ती सतत सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान आता अंशुलाने एक फोटो शेअर करत आपल्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केली आहे. अंशुला कपूर प्रेमात असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. मात्र याबाबत तिने काहीही उघड केलं नव्हतं. आता अंशुलाने स्वतः आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. पटकथा लेखक रोहन ठक्करसोबतचा एक फोटो शेअर करत आपलं नातं कन्फर्म केलं आहे. अंशुला कपूरने मालदीवच्या व्हेकेशनचा एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही पाण्यात उभे आहेत. आणि एकमेकांच्या बघत रोमँटिक झालेले दिसून येत आहेत. (हे वाचा: Nayanthara: शाहरुखच्या सिनेमासाठी नयनतारा मोडणार आपला 16 वर्षांचा नियम;पहिल्यांदाच करणार ‘ही’ गोष्ट ) अंशुला कपूर नेहमीच आपल्या फोटो आणि व्हिडीओंना अनोखे कॅप्शन देत चर्चेत असते. यावेळीही तिने असंच काहीसं केलं आहे. अंशुलाने आपल्या आणि रोहनच्या फोटोला 366 असं लिहिलं आहे. यावरुन असं लक्षात येत आहे की, या दोघांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झाला आहे. शिवाय फोटोवरुन असाही अंदाज लावला जात आहे की, रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हे दोघे मालदीवमध्ये पोहोचले आहेत. अथिया शेट्टी आणि जान्हवी कपूरने या फोटोवर हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केलं. चुलत बहिणी रिया कपूर आणि काकी महीप कपूर यांनी ‘क्यूटी असं लिहलंय.’
अंशुला आणि रोहन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये थायलंडला व्हेकेशनसाठी गेले होते. तिथे त्यांनी एका कॉन्सर्टलाही हजेरी लावली होती. या कॉन्सर्टचे काही फोटो आणि व्हिडिओही त्यांनी पोस्ट केले होते. अंशुला ही बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे. ज्यांचा 2012 मध्ये मृत्यू झाला होता. म्हणेजच ती जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांची सावत्र बहीण आहे या भावंडांमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अंशुलाच्या डेटिंगच्या चर्चा सुरु होत्या. मात्र तिने याबाबत काहीही सांगणं टाळलं होतं. आता अंशुलाने स्वतः खुलासा करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. दरम्यान अर्जुन कपूर आणि मलायका यांचं नातसुद्धा चर्चेत आलं आहे. त्या दोघांच्या आधीच अंशुला आणि रोहन लग्नगाठ बांधतात की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.