JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Arjun Kapoor ने मलायका अरोराला केलं ट्रोल, अभिनेत्रीची अशी होती प्रतिक्रिया

Arjun Kapoor ने मलायका अरोराला केलं ट्रोल, अभिनेत्रीची अशी होती प्रतिक्रिया

काल व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मलायकाने अर्जुन कपूरसोबतचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. यावरून अर्जुन कपूरने मलायकाला ट्रोल केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी- अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा**(Malaika Arora)** सोशल मीडियावर एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. दोघेही एकमेंकासोबतचे फोटो असतील किंवा व्हिडिओ शेअर करत असतात. काल व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मलायकाने अर्जुन कपूरसोबतचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. चाहत्यांना देखील या लव्हली कपलचा फोटो आवडला होता. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने या हॉट कपलने एकमेकांसोबत वेळ घालवला. मलायकाने तिचा अर्जुनचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मलायका अर्जुनला प्रेमाने घट्ट मिठी मारताना दिसत आहे. तर अर्जुन देखील तिला किस करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘Mine’ तिला यामधून नेमके काय म्हणायचे आहे हे स्पष्ट होते. यासोबतचे मलायकाने हार्ट इमोजी देखील पोस्ट केली आहे. वाचा- अर्जुन रामपालने लग्न न करताच गॅब्रिएलासोबत राहण्यावर केला मोठा खुलासा मलायका आणि अर्जुनच्या या फोटोवर बॉलीवूडमधल्या अनेक सेलेब्सने कमेंट करत त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले आहे. ट्विंकल खन्नाने देखील मलायका या फोटोवर कमेंट केली आहे. तर अर्जुन कपूरची चुलती महीप कपूरने देखील या फोटोवर हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. या दोघांच्या या स्वीट फोटोला भावना पांडेय, सबा खानसहीत अन्य बॉलिवूड सेलेब्सनी लाईक केले आहे. मलायकाने अर्जुन कपूरला स्टाईलिश अंदाजाता व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा दिल्या आहे. तर दुसरीकडे अर्जुन कपूरने मलायकाला ट्रोल केले आहे. त्याने मजेत मलायकाला ट्रोल केलं आहे.

संबंधित बातम्या

अर्जुन कपूरने म्हटलं आहे ती, मी तुला एक फोटो पाठवला आणि तू माझ्या आधीच पोस्ट केलास. मलायकाने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं यासाठी मी गिल्टी असल्याचे म्हटलं आहे. त्यांची ही इन्स्टावरील प्यारवाली तू तू में..में.. चाहत्यांना मात्र खूप आवडली आहे. अर्जुन कपूरने देखील मलायाकासाठी रोमॅंटिक पोस्ट लिहिली होती.

मलायका या फोटोत पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट्स आणि क्रॉप टॉपमध्ये ग्लॅमरस तर दिसत आहे पण तितकीच सुंदर देखील दिसत आहे. तर अर्जुन कपूर काळ्या रंगाच्या पँटमध्ये हॅण्डसम दिसत आहे. या फोटोवर कमेंटचा पाऊस पडत आहे. मागच्या महिन्यात मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या. यावर अर्जुन कपूरने त्या अफवा असल्याचे म्हणत सर्व चर्चा खोट्या असल्याचे सांगितलं होत .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या