JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सनई-चौघडे वाजणार? अर्जुन कपूरनं घेतली मलायकाच्या आईची भेट

सनई-चौघडे वाजणार? अर्जुन कपूरनं घेतली मलायकाच्या आईची भेट

मलायका आणि अर्जुनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यांच्या लग्नाच्या चर्चां पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 डिसेंबर : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे या संपूर्ण वर्षातलं सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल ठरलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो त्यानंतर सोशल मीडियावरुन दिलेली नात्याची कबुली आणि एकमेकांबद्दल उघडपणे केलेली वक्तव्य सर्वच गोष्टींमुळे वर्षभर ही जोडी चर्चेत राहिली. पण आता पुन्हा एकदा या दोघांच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत आणि आता कारण आहे ते अर्जुन कपूर मलायकाच्या आई-वडीलांना भेटायला जाण्याचं. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यांच्या लग्नाच्या चर्चां पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा तिच्या घरी जातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. पण या फोटोमागचं सत्य काही वेगळंच आहे. मलायकाच्या घरी ख्रिसमस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात अर्जुनलाही निमंत्रण होतं. या पार्टीला जाताना मलायका आणि अर्जुनला एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण मलायका आणि अर्जुन या ठिकाणी मात्र वेगवेगळ्या कारने आले होते. हे सर्व आउटसाइड फोटो आहेत. तर मलायका किंवा अर्जुननं या पार्टीचे इनसाइड फोटो अद्याप शेअर केलेले नाहीत. कुशल पंजाबीच्या आत्महत्येबद्दल मित्राचा धक्कादायक खुलासा

यावेळी मलायका निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. ती नेहमीप्रमाणे या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत होती. यासोबत तिनं हार्टशेप पर्स कॅरी केली होती. तर अर्जुननं यावेळी ब्लॅक कलरचा हुडी टी-शर्ट घातला होता. यावेळी तो कॅज्युअल लुकमध्ये दिसला. वादग्रस्त व्हिडीओनंतर रवीना टंडनचा माफीनामा, पोस्ट लिहून मांडली बाजू मलायका-अर्जुनच्या नात्याबद्दल बोलायचं तर या दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. त्यानंतर एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो सुद्धा शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नाच्या चर्चा बऱ्याच वेळा झाल्या मात्र या दोघांनीही सध्या तरी लग्नाचा कोणताही विचार नसल्याचं सांगत या चर्चा फेटाळल्या आहेत. 2017 मध्ये अरबाज खानशी घटस्फोट झाल्यानंतर मलायकानं अर्जुनसोबत मूव्ह ऑन केलं तर दुसरीकडे अरबाज जॉर्जिया अँड्रीयानीशी रिलेशिपमध्ये आहे. अक्षय-सलमानच्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याची आत्महत्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या