JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Big Boss Marathi 4: 'मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये'; पहिल्याच दिवशी शेवंताचा घणाघात

Big Boss Marathi 4: 'मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये'; पहिल्याच दिवशी शेवंताचा घणाघात

बिग बॉस मराठी 4 चा नुकताच एक प्रोमो समोर आला असून सदस्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे दिसून येत आहे, याचसोबत मतभेद देखील झाले.

जाहिरात

अपूर्वा नेमळेकर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 ऑक्टोबर :  “ALL IS WELL” म्हणत काल बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या घराचा दरवाजा उघडला. संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता बिग बॉस मराठीच्या सिझन चारमध्ये कोण सदस्य असतील?. अखेर काल त्या बातम्यांना, चर्चेला पूर्णविराम लागला आणि 16 सदस्यांची काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री झाली. घरात प्रवेश होताच एकमेकांबद्दल कुरघोड्या आणि टीका सुरु झाल्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पाहून यंदाच्या सीझनची धमाकेदार सुरुवात झाली. बिग बॉस मराठी 4 चा नुकताच एक प्रोमो समोर आला असून सदस्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे दिसून येत आहे, याचसोबत मतभेद देखील झाले. प्रत्येक सदस्याला घरात प्रवेश करण्याआधीच त्यांची कामे बिग बॉसने ठरवून दिली. पहिल्याच दिवशी गटातील चारही सदस्यांना कोणता खेळाडू निरुपयोगी आहे? हे ठरवायला सांगितलं. मग काय वादाची ठिणगी तर पडणारच होती. त्रिशूलचे म्हणणे पडले किरण माने. कारण आपण तरुण आहोत. त्यावर किरण माने म्हणतात ‘मी काय म्हातारा वाटलो की काय’. तर अपूर्वाने प्रसादचे नावं घेतले, ती असं देखील म्हणाली “मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये” आता पहिल्याच टास्कमध्ये फूल टू राडा होणार असल्याचं दिसत आहे. हेही वाचा  -  Bigg Boss Marathi 4 : ‘शेवंतामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं पण… ‘; ‘बिग बॉस मराठी 4’ स्पर्धक अपूर्वाविषयी या रंजक गोष्टी माहितेय का? समोर आलेला हा प्रोमो सध्या जोरदार चर्चेत आहे. काही क्षणातच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पहिल्याच दिवशी असं वातावरण पाहून प्रेक्षकही कमालीचे उत्सुक आहेत. आजपासून 100 दिवस 16 सदस्य कॅमेराच्या काय तर महाराष्ट्राच्या नजरकैदेत असणार असं म्हणायला हरकत नाही.

संबंधित बातम्या

दरम्यान,  ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंतामुळे अपूर्वाला नवी ओळख मिळाली. या मालिकेतील शेवंता खूपच गाजली होती. या मालिकेतून ती घराघरात पोहचली होती. तिच्या शेवंता या भूमिकेनं तिचा चाहतावर्ग आणखीन वाढला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या